February 24, 2024
PC News24
जीवनशैली

मुंबई:ज्येष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकर यांचे निधन

मुंबई:ज्येष्ठ पत्रकार, लेखक शिरीष कणेकर यांचे निधन

मराठीतील ज्येष्ठ लेखक, पत्रकार आणि कथाकथनकार,क्रीडा आणि सिने-पत्रकारिते वर आपल्या खास शैलीतून रसिकांना आनंद देणारे शिरीष कणेकर यांनी वयाच्या 80 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.

आज सकाळी (25 जुलै) प्रकृती खालावल्याने शिरीष कणेकर यांना हिंदुजा रुग्णालयात दाखल केलं होतं. दरम्यान हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाले.

कधी टोकदार तर कधी खुमासदार शैलीने लेखन करणारे लेखक आणि फिल्मी गप्पांची मैफल रंगविणारे बहारदार वक्ते अशी शिरीष कणेकर यांची ओळख होती.. सिनेमा, क्रिकेट आणि राजकारण यावरील त्यांचे वृत्तपत्रांतील स्तंभ विशेष प्रसिद्ध आहेत. तर ‘कणेकरी’,’फिल्लमबाजी’, ‘शिरीषासन’ हे त्यांचे विनोदी लेख रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतले होते. शिरीष कणेकर यांच्या निधनानंतर पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

शिरीष कणेकर यांनी मुंबई विद्यापीठातून एलएलबी (LLB) झाले होते. इंडियन एक्स्प्रेस, फ्री प्रेस जर्नल या प्रसिद्ध इंग्रजी वृत्तपत्रांतून पत्रकार म्हणून त्यांनी काम केलं होतं. याशिवाय लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, सामना आणि जवळपास सगळ्याच मराठी वृत्तपत्रांतील त्यांचे स्तंभलेखन प्रसिद्ध होते. त्याचप्रमाणे साप्ताहिक मनोहर, लोकप्रभा, चित्रलेखा मधील त्यांचे लेख प्रसिद्ध आहेत. ‘लगाव बत्ती’ या त्यांच्या कथासंग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट विनोदी वाङ्‌मयाचा चिं.वि. जोशी पुरस्कार मिळाला होता

रायगड जिल्ह्यातील पेण हे कणेकर यांचं मूळ गाव. त्यांचे वडील रेल्वेमध्ये डॉक्टर होते. त्यामुळे भायखळ्याच्या रेल्वे रुग्णालयाच्या सरकारी निवासस्थानात त्यांचं बालपण गेलं.

 

मुंबई पत्रकार संघातर्फे दिला जाणारा ‘कै. विद्याधर गोखले ललित साहित्य पुरस्कार’, नाशिक महापालिका वाचनालया तर्फे ‘सूरपारंब्या’ या लेखसंग्रहास सर्वोत्कृष्ट वाङ्‌मयाचा पुरस्कार, ‘लगाव बत्ती’ या संग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषदेचा उत्कृष्ट विनोदी वाङ्‌मयाचा चिं.वि. जोशी पुरस्कार, अशा अनेक पुरस्कारांनी शिरीष कणेकर यांना सन्मानित करण्यात आले आहे.

तसेच एखाद्या समस्येवर विनोदी खुमासदार शैलीतून लिहिणारे लेखक म्हणून ओळखले जाणारे शिरीष कणेकर काळाच्या पडद्याआड गेले आहेत. क्रिकेट,मनोरंजन विश्व आणि राजकारण हे तिन्ही त्यांच्या आवडीचे विषय होते.

क्रिकेट व सिनेसृष्टीतल्या गमती-जमती हे त्यांच्या एकपात्री कथनाच्या कार्यक्रमातील व लिखाणातील विशेष आवडीचे विषय होते.

Related posts

छ. संभाजीनगर: महाविकास आघाडीच्या सभेच्या दिवशीच भाजपची ‘सावरकर सन्मान रॅली’

Admin

“शब्दांचाही रियाज करावा लागतो”…प्रसिद्ध निवेदिका सौ.सुकन्या जोशी यांचा शब्दमैफल पुरस्काराने सन्मान…

pcnews24

जाणून घ्या आजचे राशिभविष्य!

pcnews24

वाढत्या तापमानात घ्या आरोग्याची काळजी.

pcnews24

देशाचा विकास करण्यासाठी तंत्रज्ञानासोबत अध्यात्माची जोड हवी– पोपटराव पवार.भारतरत्न जे. आर. डी. टाटा उद्योग पुरस्कार रामदास काकडे यांना प्रदान.

pcnews24

पुणे: मार्केट यार्डाच्या आवारात चिकन आणि मासळी बाजार सुरू करण्याचा घाट;अनेकांचा विरोध

pcnews24

Leave a Comment