February 24, 2024
PC News24
सामाजिक

पिंपरी-चिंचवड पोलीस मुख्यालयाच्या जागेस त्वरित मंजुरीची मागणी: आमदार अश्विनी जगताप.

पिंपरी-चिंचवड पोलीस मुख्यालयाच्या जागेस त्वरित मंजुरीची मागणी: आमदार अश्विनी जगताप

मुंबई येथील पावसाळी अधिवेशनात औचित्याच्या मुद्द्याद्वारे पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय व मुख्यालया करिता जागा उपलब्ध करणे,नवीन पोलीस स्टेशन करिता पद निर्मिती करणे बाबतचा मुद्दा आमदार अश्विनी जगताप यांनी उपस्थित केला आहे.पिंपरी-चिंचवड पोलीस मुख्यालयाच्या जागेला त्वरित मंजुरी द्या अशी मागणी आमदार अश्विनी जगताप यांनी आज सभागृहात केली.

पिंपरी-चिंचवड पोलीस मुख्यालायाकरिता विठ्ठलनगर, देहू येथील गट नं ९७ येथील २० हेक्टर जागा पोलीस मुख्यालयाकरिता हस्तांतरित करण्या बाबतचा प्रस्ताव राज्य शासनाकडे मागील तीन वर्षापासून मंजुरी अभावी प्रलंबित आहे तसेच आयुक्तालयाच्या प्रशासकीय इमारती करिता चिखली गट नं ५५३ पैकी ३.३९ हेक्टर जागा हस्तांरित करण्या बाबत परिपूर्ण प्रस्ताव शासनाच्या नगरविकास विभागाकडे मंजुरीअभावी प्रलंबित आहे. त्याला तत्काळ मंजुरी देण्याची मागणी आमदार अश्विनी जगताप यांनी सभागृहात केली.

१५ ऑगस्ट २०१८ रोजी स्वतंत्र पोलीस आयुक्तालयाची निर्मिती होऊनही मागील तीन वर्षात पोलीस आयुक्तालयाचा प्रशासकीय कामकाज चिंचवड येथील मनपाच्या शाळेच्या भाडेतत्वावरील इमारतीत अपुऱ्या जागेत सुरु आहे. आयुक्तालयाची जागा अपुरी असल्याने क वाहतूक शाखा,गुन्हे शाखा,लेखाशाखा, इ. शाखेचे कामकाज शहरातील विविध ठिकाणी भाडेतत्त्वावर घेतलेल्या अपुऱ्या जागेत सुरु आहे.

पोलीस आयुक्तालय अंतर्गत रावेत, म्हाळुंगे , शिरगाव या नवीन तीन पोलीस स्टेशनची घोषणा होऊनही अद्यापही नवीन पोलीस स्टेशन कार्यान्वित झाले नाहीत. अपुऱ्या मनुष्यबळ अभावी पद भरती निर्मितीचा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी प्रलंबित आहे. उद्योग नगरीतील कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न गंभीर आहे. पूर्ण क्षमतेने मनुष्यबळ, वाहन,साधन सामुग्री यांसारख्या मुलभूत समस्यांचा अभाव आहे.

पोलीस आयुक्तालयाची मागील ४ वर्षापासून स्थापना होऊनही अनेक मुलभूत,पायाभूत सुविधांचा अभाव असल्याने याबाबत उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे याबाबत जगताप यांनी लक्ष वेधले.

Related posts

ड्रोनची नजर असणार अनधिकृत बांधकामावर

pcnews24

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने महात्मा गांधी आणि भारताचे दिवंगत माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.

pcnews24

पोलिसांचे विशेष बाल पथक करते आहे समुपदेशन,चुकीच्या मार्गाला मिळणार योग्य ‘वळण’.

pcnews24

रा.स्व.संघातर्फे भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन.

pcnews24

‘देश एक संगीत अन् स्वयंसेवक त्याची सरगम’

pcnews24

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर आज ब्लॉक!

pcnews24

Leave a Comment