February 24, 2024
PC News24
आंतरराष्ट्रीय

देश:अंजू – नसरुल्ला कहाणीत २४ तासांत नवा ट्विस्ट; मैत्री की प्रेम?

देश:अंजू – नसरुल्ला कहाणीत २४ तासांत नवा ट्विस्ट; मैत्री की प्रेम?

फेसबुक फ्रेंडच्या भेटीसाठी पाकिस्तानला गेलेल्या अंजूनं आपण पुढील २ ते ४ दिवसांत भारतात परतणार असल्याचं म्हटलं होतं. मात्र आता तिच्या मित्राची भाषा अचानक बदलली आहे. अंजू म्हणते पाकिस्तानमध्ये एका लग्न सोहळ्यासाठी आले असून पुढच्या काही दिवसांमध्येच भारतात परतेन, असं तिनं सांगितलं. प्रियकराकडे नव्हे, तर मित्राकडे आल्याचा दावा तिनं केला आहे. अंजूचा व्हिसा २० ऑगस्टला संपणार आहे. मात्र या घडामोडींमध्ये आता वेगळाच ट्विस्ट आला आहे.

अंजूचा मित्र सातत्यानं वेगवेगळी माहिती देत आहे. आम्ही साखरपुडा करणार असल्याचं त्यानं सुरुवातीला म्हटलं. त्यानंतर त्यानं लव्ह स्टोरीचा अँगलच नाकारला. आता त्याचा सूर पुन्हा बदलला आहे. अंजूची इच्छा असल्यास मी लग्नास तयार आहे, असा पवित्रा अंजूचा मित्र असलेल्या नसरुल्लानं घेतला आहे. तो खैबर पख्तुनख्वाच्या अपर दीर जिल्ह्याचा रहिवासी आहे एका वृत्त वहिनी सोबत संवाद साधताना अंजूचा मित्र नसरुल्लाहनं अनेक गोष्टींचा उलगडा केला. ‘अंजूसोबत २०१९ मध्ये फेसुबकच्या माध्यमातून ओळख झाली. आम्ही दोघे चांगले मित्र आहोत. मी अंजूवर प्रेम करतो. तिच्याशी लग्न करु इच्छितो. मी अंजूसाठी भारतात येण्यास तयार आहे. पण लग्न अंजूच्या इच्छेवर अवलंबून आहे. तिची इच्छा नसेल तर लग्न होणार नाही. मला त्यावर कोणताच आक्षेप नसेल,’ असं नसरुल्लाह म्हणाला.अंजूला पाकिस्तान अतिशय आवडला आहे. मी अंजूला अनेक ठिकाणी फिरायला घेऊन गेलो. ती इथे पूर्णपणे सुरक्षित आहे. पोलिसांनीदेखील तिला सुरक्षा पुरवली आहे, असं नसरुल्लाहनं सांगितलं. ‘अंजू विवाहित आहे. तिला दोन मुलं आहेत. मला या सगळ्याची कल्पना आहे. मात्र माझा कोणताही आक्षेप नाही. मी त्यांना स्वीकारण्यास तयार आहे. अंजूच्या इच्छेनुसार सगळं होईल. अंजूची इच्छा असेल तिथे मी राहीन. मग भारत असो वा पाकिस्तान,’ असं म्हणत नसरुल्लाहनं साखरपुड्याच्या वृत्ताचं खंडन केलं.

Related posts

ए आयच्या (आर्टिफिशियल इन्टिलिजन्स) जगात कोण टिकेल’? विनायक पाचलग यांचे मार्गदर्शन- पीसीसीओई महाविद्यालयात विद्यार्थी परिषदेचे आयोजन

pcnews24

देश: 21 ऑक्टोबर रोजी गगनयान घेणार उड्डाण

pcnews24

World Cup 2023 : भारताने आपल्या पारंपरिक दुश्मनाला केले चारीमुंड्या चीत

pcnews24

रोमहर्षक सामन्यात श्रीलंकेवर मात करून भारतीय संघ आशिया कपच्या अंतिम फेरीत दाखल

pcnews24

क्लाउड बिल भरण्यास ट्विटर चा Googleला यांचा नकार.. प्लॅटफॉर्मर अहवाल

pcnews24

पिंपरी चिंचवड:ओंकार पाटील याची ‘युनायटेड किंगडम’येथे पदव्युत्तर संशोधन साठी निवड

pcnews24

Leave a Comment