February 24, 2024
PC News24
वाहतूक

महाराष्ट्र:कोकणवासियांच्या गणेशोत्सव आनंदासाठी रेल्वेचा मोठा निर्णय, विनाआरक्षित रेल्वे फेऱ्यात वाढ

महाराष्ट्र:कोकणवासियांच्या गणेशोत्सव आनंदासाठी रेल्वेचा मोठा निर्णय, विनाआरक्षित रेल्वे फेऱ्यात वाढ

गणेशोत्सवासाठी गावी जाण्यासाठी मध्य रेल्वे आणि कोकण रेल्वे विभागाने कोकणवासियांसाठी मोठा निर्णय घेतला आहे.त्यामुळे आता कोकणवासियांना तब्बल २६६ फेऱ्या उपलब्ध झाल्या आहेत.

खास गणेशोत्सवासाठी मध्य आणि कोकण रेल्वेने २४ डब्यांच्या १८ विनाआरक्षित रेल्वे फेऱ्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी मध्य व कोकणे रेल्वेने २०८ आणि पश्चिम व कोकण रेल्वेने ४० फेऱ्यांची घोषणा केली आहे. यामुळे उत्सव कालावधीत कोकणात जाणाऱ्यांसाठी एकूण २६६ फेऱ्या उपलब्ध झाल्या आहेत. या गाड्यांच्या सविस्तर थांब्यांची माहिती जाणून घेण्यासाठी रेल्वे संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन रेल्वेने केले आहे.

०११८५ लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई-कुडाळ गणपती विशेष गाडी १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान दर सोमवारी, बुधवारी आणि शनिवारी धावणार आहे. ही गाडी एलटीटीहून रात्री १२.४५ वाजता सुटणार असून सकाळी ११.३० वाजता कुडाळला पोहोचेल.

०११८६ कुडाळ ते एलटीटी गणपती विशेष गाडी १३ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरदरम्यान दर मंगळवारी, गुरुवारी आणि रविवारी धावणार आहे. ही गाडी कुडाळहून दुपारी १२.१० वाजता सुटणार असून एलटीटी येथे मध्यरात्री १२.३५ वाजता पोहोचेल.

Related posts

निष्काळजीपणे वाहन चालविणे आता,अजामीनपात्र गुन्हा दाखल.

pcnews24

ओडिशात 3 गाड्या रुळावरून घसरल्याने 50 पेक्षा जादा ठार, 350 पेक्षा जास्त जखमी

pcnews24

पुणे महापालिकेचा BRT मार्ग हटवण्याचा निर्णय

pcnews24

महानगरपालिके तर्फे अर्बन स्ट्रीट स्केप (USD)” व रस्ते सुरक्षेबाबत कार्यशाळेबाबत.

pcnews24

एसटीच्या प्रवाशांसाठी महामंडळाचे महत्वपूर्ण पाऊल….अधिकृत थांब्यावर नाश्ता ३० रूपयांना मिळणार

pcnews24

पुणे:स्वयंचलित सिग्नल यंत्रणा व इतर कामानिमित्ताने शनिवार रविवार लोकल बंद,पहा अधिक माहिती.

pcnews24

Leave a Comment