February 24, 2024
PC News24
गुन्हा

दहशतवाद्यांनी जंगलात केली बॉम्बस्फोटाची चाचणी- एटीएस पथकाची माहिती

दहशतवाद्यांनी जंगलात केली बॉम्बस्फोटाची चाचणी- एटीएस पथकाची माहिती

कोथरूड पोलिसांनी नाकाबंदीत पकडलेल्या दोन दहशतवाद्यां बाबतची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.या दोन दहशतवाद्यांनी पुणे,सातारा,कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याची माहिती दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) न्यायालयास दिली.

आरोपींवर दाखल केलेल्या गुन्ह्यात बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये कलम वाढ करण्यात आली आहे. दोन्ही दहशतवाद्यांची पोलिस कोठडी संपत असल्याने दहशतवाद विरोधी पथकाने दोघांना आज जिल्हा व सत्र न्यायालयात हजर करण्यात आले होते.

आरोपींवर दाखल केलेल्या गुन्ह्यात बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये कलमामधे वाढ करण्यात आली आहे.

मोहम्मद युनूस मोहम्मद याकू साकी (वय 24), मोहम्मद इम्रान मोहम्मद युसूफ खान (वय 23 , दोघे सध्या रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.त्यांच्याबरोबर असलेला साथीदार मोहम्मद शहनवाज आलम (वय 31) पसार झाला असून त्याचा शोध घेण्यात येत आहे. दहशतवाद्यांकडून पुणे,सातारा,आणि कोल्हापूरच्या जंगलात बॉम्बस्फोटाची चाचणी केल्याचे एटीएसने न्यायालयात सादर केलेल्या रिमांड रिपोर्टमध्ये नमूद केले आहे.

तपासात आले समोर

इस्लाममध्ये सांगितलेल्या पवित्र गोष्टींसाठी जीव गेला, तरी ते करण्यासाठी त्यांची तयारी होती. त्यानुसार त्यांचे ब्रेन वॉश करण्यात आले होते. घातपातासाठी दहशतवादी विचारधारा स्वीकारण्यापासून प्रशिक्षण आणि त्यानंतर प्रत्यक्षात कारवाई करेपर्यंतच्या सर्व पद्धती दोघांनी आत्मसाद केल्या होत्या.

* इसिसशी सलग्न अल सुफा संघटनेची विचारधारा मानणारे

* दहशतवाद्यांकडून पुणे, सातारा, कोल्हापूरच्या जंगलात बॉम्ब टेस्टींग

* दहशतवाद्यांकडून जप्त केलेली पावडर ही स्फोटकच असल्याचे एक्स्प्लोझिव्ह वेपर डिटेक्टरमध्ये स्पष्ट

* देशविघातक कारवाई करण्याचा उद्देश असल्याचे पेन ड्राईव्हमधून आले समोर

* दोघेही आयसिसच्या अल सुफा संघटनेशी संबंधित असल्याचे समोर

* पेनड्राईव्ह मधून निघालेल्या माहितीचा ४३६ पानांचा तपास अहवाल न्यायालयात

दोन्ही दहशतवाद्यांची पोलिस कोठडी संपत असल्याने दहशतवाद विरोधी पथकाने दोघांना जिल्हा व सत्र न्यायालयात हजर केले. त्यावेळी सत्र न्यायाधीश एस. व्ही. कचरे यांच्या न्यायालयाने त्यांना पाच ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

Related posts

पिंपरी चिंचवड:थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त.४ दिवसांत ६८ मालमत्ता जप्त

pcnews24

अदानींविरोधात पुरावे काय आहेत ?

pcnews24

जबरी चोरी व घरफोडी करणारी आंतर राज्यीय टोळी जेरबंद आरोपींकडून एकूण 36 गुन्हे उघडकीस व 35,83,300 /- रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त.

pcnews24

पुणे कॅम्प परिसरातील कपड्याच्या दुकानात तरुणीचा विनयभंग

pcnews24

IPL सट्टाबहाद्दरांना हिंजवडी पोलिसांकडून अटक

pcnews24

पोलिसांचे विशेष बाल पथक करते आहे समुपदेशन,चुकीच्या मार्गाला मिळणार योग्य ‘वळण’.

pcnews24

Leave a Comment