February 24, 2024
PC News24
हवामान

रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट

रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट

राज्यातील काही भागात आजही पावसाचा जोर वाढणार आहे. हवामान विभागाने व्यक्त केलेल्या अंदाजाप्रमाणे महाराष्ट्रात सर्वदूर मुसळधार पाऊस होऊ शकतो. भारतीय हवामान विभागाने(IMD)मुंबई, पुण्यासह कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण किनारपट्टी, विदर्भातील काही जिल्हे आणि मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह इतर काही भागात 28 जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे.

हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणे 26 जुलैला मुंबई, पालघर, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर या जिल्ह्यात पावसाचा जोर वाढेल. आयएमडीने रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट दिला आहे तर मुंबई, पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग, कोल्हापूर,नांदेड, गडचिरोली, भंडारा, गोंदिया या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे.

कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्र 204.4 मिली मीटर इतका पाऊस पडू शकतो, असं हवामान विभागाने म्हटलं आहे. यामुळे काही भागात पूरपरिस्थिती उद्भवू शकते. त्याचबरोबर नागरिकांनी पाणी भरणाऱ्या ठिकाणांपासून लांब राहावं आणि संवेदनशील ठिकाणी जाऊ नये, असं आवाहनही हवामान विभागाकडून करण्यात आलं आहे.

Related posts

महाराष्ट्र: पुढील तीन तासात राज्यात मुसळधार पावसाचा इशारा.

pcnews24

महाराष्ट्र :हवामान खात्याचा २९ जूनला ऑरेंज अलर्ट,राज्यात अतिवृष्टीचा इशारा.

pcnews24

पुणेकरांसाठी अलर्ट जारी…

pcnews24

राज्याचे पुढील २ ते ३ दिवस पावसाचे, अधिक माहिती साठी वाचा.

pcnews24

पुणे जिल्ह्यासह महाराष्ट्रात पावसाची जोरदार बॅटिंग;वाचा हवामान विभागाची अपडेट.

pcnews24

पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार.

pcnews24

Leave a Comment