February 24, 2024
PC News24
महानगरपालिका

पिंपरी चिंचवड:नागरिकांना वेठीस धरणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका; संदीप वाघेरे यांची मागणी

पिंपरी चिंचवड:नागरिकांना वेठीस धरणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाका; संदीप वाघेरे यांची मागणी

शहरातील नागरिकांच्या सोयीसाठी म्हणून केली जाणारी विकास कामे लवकरात लवकर पूर्ण करायची असतात याचा विसर बहुतेक महापालिकेच्या बीआरटीएस विभागाला पडलेला दिसून येत आहे.पिंपरीगाव ते पिंपळे सौदागर येथील नदीवरील पुलाचे काम गेली 2 वर्षे संथगतीने सुरु आहे. नागरिकांना वेठीस धरणाऱ्या ठेकेदाराचा काळ्या यादीमध्ये समावेश करण्याची मागणी माजी नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.

महापालिका आयुक्त शेखर सिंह यांना दिलेल्या पत्रात त्यांनी सांगितले आहे की पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या बीआरटीएस विभागामार्फत पिंपरीगाव ते पिंपळे सौदागर पर्यंत नदीवरील पुलाच्या कामाचे आदेश व्ही.एम. मातेरे इंफ्रा .( इ ) प्रा.ली. यांना 22 डिसेंबर 2022 रोजी 18 महिने कालावधीसाठी देण्यात आलेले आहेत.

 

तसेच या कामासाठी प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार याकामी मे.ओएस असीस्टीम स्तूप यांची निविदा पूर्व व निविदा पश्चात कामाकरिता नेमणूक करण्यात आलेली आहे.या कामाची मुदत संपून देखील अद्यापपर्यंत 60 टक्के देखील काम पूर्ण केले नसल्याचे दिसून येत आहे. असे असताना ठेकेदाराने पुन्हा मुदतवाढीची मागणी केली. बीआरटीएस विभागामार्फत मुदतवाढीचा प्रस्ताव देण्यात आलेला होता. हा भाववाढ प्रस्ताव मान्य करून पुन्हा नव्याने कामास मुदतवाढ देण्यात आली होती.या सर्व प्रकरणात नागरिकांना वेठीस धरून ठेकेदाराचे तसेच सल्लागाराचे हित जोपासण्याचा महापालिकेचा भोंगळ कारभार सुरु असल्याचे समोर येत आहे. ज्या कामास व्यवस्थापन सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच नियोजनबद्ध काम करण्यास महापालिका यंत्रणा असूनही काम वेळेवर होत नाही याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे.

Related posts

निगडी ते दापोडी रस्त्यांचे सुशोभीकरण पण फेरीवाल्यांच्या व्यवसायाचे काय?

pcnews24

अनधिकृत होर्डिंग काढून टाकण्याचे आदेश.. महापालिकेच्या आकाशचिन्ह व परवाना विभागाची ३७ होर्डिंगवर कारवाई.

pcnews24

पंतप्रधान आवास योजनेतील सदनिकांसाठी अर्ज भरण्यास मुदत,वाढीची आयुक्तांकडे मागणी:सचिन काळभोर.

pcnews24

महापालिकेत प्रतिनियुक्ती,यशवंत डांगे, किरणकुमार मोरे यांची नियुक्ती

pcnews24

स्थायी समिती बैठक : महत्त्वाचे निर्णय.

pcnews24

संभाजी नगर चिंचवड येथील बहिणाबाई चौधरी प्राणिसंग्रहालय सहा वर्षांपासून बंद, नूतनीकरणावर मोठा खर्च.

pcnews24

Leave a Comment