February 24, 2024
PC News24
देश

1999 : कारगिल विजय दिवस देशभरात साजरा करताना बलीदान दिलेल्या सैनिकांना श्रद्धांजली!!

1999 : कारगिल विजय दिवस देशभरात साजरा करताना बलीदान दिलेल्या सैनिकांना श्रद्धांजली!!

1999 मध्ये भारतीय सैनिकांच्या अतुलनीय दृढनिश्चयाने 55 दिवसांच्या युद्धात पाकिस्तानच्या सैन्याला माघार घेण्यास आणि संरक्षण जागा रिकामी करण्यास भाग पाडले गेले होते. व त्यांना कारगिल मधून हुसकावून लावून मोठा विजय मिळवला होता म्हणून दरवर्षी 26 जुलै रोजी कारगिल विजय दिवस साजरा केला जातो.

पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेला घेऊन अलिखित कराराचे उल्लंघन करत भारतीय नियंत्रणात असलेल्या काही चौक्यांवर कब्जा केला होता.पाकिस्तानच्या सैन्याला हुसकावून लावण्यासाठी हे युद्ध लढले गेले होते व त्यामधे भारतीय सैन्य यशस्वी झाले.

दरवर्षी, कारगिल विजय दिवसानिमित्त, भारताचे पंतप्रधान नवी दिल्लीच्या इंडिया गेटजवळील अमर जवान येथे कारगिल युद्धात आपले मौल्यवान प्राण गमावलेल्या शूर सैनिकांना श्रद्धांजली अर्पण करतात. भारतीय नागरिक सुद्धा सोशल मीडियाद्वारे सर्वाना शुभेच्छा व शहिदांना श्रद्धांजली देत हा दिवस साजरा करतात.

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, काँग्रेस ज्येष्ठ नेते राहुल गांधी, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार आदी राजकारण्यांनी सुद्धा कारगिल दिवस साजरा केला आहे. सोशल मीडिया वर नागरिकांना शुभेच्छा व युद्धात शाहिद झालेल्याना श्रद्धांजली दिली आहे.

अभिनेता अक्षय कुमार, अभिषेक बच्चन, सुनील शेट्टी, सिद्धार्थ मल्होत्रा, अभिनेत्री निम्रत कौर, माजी क्रिकेटपटू युवराज सिंह,अशा सेलिब्रिटींनी सुद्धा सोशल मीडियाद्वारे शुभेच्छा दिल्या असून प्रसिद्ध वालुका शिल्पकार सुदर्शन पटनाईक यांनी देखील चांगले वालूशिल्प कलेतून शुभेच्छा दिल्या आहेत.

Related posts

देश: भारतातील 6 राज्यांत अलर्ट ! परत चीनचा न्युमोनिया..

pcnews24

बैलगाडा शर्यतींवर आज ‘सुप्रीम कोर्टाचा’ निकाल.

pcnews24

‘देशात लवकरच 6 जी युग अवतरणार’ -पं.नरेंद्र मोदी

pcnews24

जीएसटी नियमात बदल, जाणून घ्या काय आहे नवीन बदल.

pcnews24

देश:”कुटुंबाला वाचवणे हे विरोधकांचे एकमेव ध्येय..विरोधकांच्या बैठकीवर नरेंद्र मोदींची घणाघाती टीका.

pcnews24

2,000 रुपयांच्या नोटा होणार बंद

pcnews24

Leave a Comment