March 1, 2024
PC News24
राज्य

सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी,एनडीआरएफचे पथक कराडमध्ये दाखल.

सातारा जिल्ह्यात अतिवृष्टी,एनडीआरएफचे पथक कराडमध्ये दाखल.

पाटण, महाबळेश्वर, वाई, जावली व सातारा या तालुक्यात अतिवृष्टी चालू आहे. त्यामुळे एनडीआरएफचे पथक कराडमध्ये दाखल झाले आहे. या पथकात अधिकारी व जवान असे २५ जणांचा समावेश आहे.

दरम्यान, जिल्ह्याला ज्या-ज्या वेळी रेड अलर्ट अथवा ऑरेन्ज अलर्टचा इशारा देण्यात येईल, अशावेळी पश्चिमेकडील तालुक्यातील विशेषत: पाटण, महाबळेश्वर, वाई, जावली व सातारा या तालुक्यामध्ये तसेच उर्वरित तालुक्यामधील ज्या गावांमध्ये संभाव्य भूस्खलन, दरडी कोसळून धोका निर्माण होऊ शकतो. अशा गावांमधील नागरिकांना आगाऊ सूचना देऊन तातडीने सुरक्षितस्थळी हलविण्याची कार्यवाही करण्याची जबाबदारी ही संबंधित गावचे मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, पोलीस पाटील व कोतवाल यांची राहिल, असे आदेशही जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. या बाबीमध्ये हलगर्जीपणा अथवा टाळाटाळ झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधितांविरुध्द आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ अन्वये कठोर कारवाई करणेत येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

 

कोयना धरणातून पाण्याच्या विसर्गाला सुरुवात;आज सायंकाळी पाच वाजेपर्यंत कोयना धरणात ६२.४१ टीएमसी पाणीसाठा झाला असून, पाणी पातळी २१२१ फूट झाली आहे. धरणात ४२ हजार ६६९ क्यूसेक्स पाण्याची आवक होत असून १०५० क्यूसेक्स पाणी सोडण्यात येत आहे. कोयनानगर ५१ व नवजा परिसरात ६० मिलिमीटर, तर महाबळेश्वरला ४६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Related posts

आता चेंडू महापालिकांच्या कोर्टात – राज्यातील प्रमुख सर्व महापालिका हद्दीतील घरे नियमितीकरण प्रक्रियेस नवीन शासन निर्णयामुळे वेग. प्रशमन शुल्क व विकास शुल्क नाममात्र असावे या बाबत आमदारांची भूमिका ठरणार महत्वाची. – विजयकुमार पाटील

pcnews24

नागपूर: संपूर्ण योग ग्रामसाठी नागपूर मधील खुर्सापार गावाची केंद्र सरकारने केली निवड.

pcnews24

आणखी दहा आमदार फुटणार ? चंद्रकांत बावनकुळे.

pcnews24

मंत्रीमंडळ बैठकीत आज घेतले गेलेले निर्णय.

pcnews24

सरकारचा जीआर जरांगे पाटील यांना अमान्य- आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार

pcnews24

शरद पवारांचे खळबळजनक विधान,दूटप्पी विधानाने कार्यकर्ते संभ्रम अवस्थेत.

pcnews24

Leave a Comment