February 24, 2024
PC News24
महानगरपालिका

महानगरपालिका : कर न भरलेल्या मालमत्तांचा टप्या-टप्याने लिलाव.

महानगरपालिका : कर न भरलेल्या मालमत्तांचा टप्या-टप्याने लिलाव.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या थकबाकी असलेल्या दोन हजार पेक्षा जास्त मालमत्ता गेल्या वर्षी महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने सील केल्या आहेत. या सील केलेल्या मालमत्ता धारकांना कर भरण्याचे आवाहन केले. त्यानंतर काही मालमत्ता धारकांनी आपल्या कराचा भरणा केला आहे. मात्र, ज्या मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला नाही, अशा मालमत्ता टप्या-टप्याने विक्री करण्याचे नाईलाजाने निर्णय महापालिकेने घेतला आहे.जप्त केलेल्या मालमत्तांची विक्री कशा पद्धतीने करावी, यासाठी महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने आज बुधवारी संत तुकाराम नगर येथील आचार्य अत्रे सभागृहात कर संकलन विभागाचे मंडलाधिकारी, गट लिपिक यांना प्रशिक्षण देण्यात आले.

हे प्रशिक्षण कर संकलन विभागाचे सल्लागार अनिल लाड यांनी दिले. यावेळी कर संकलन व कर आकारणी विभागाचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख, प्रशासन अधिकारी राजाराम सरगर, नाना मोरे, कार्यालय अधीक्षक विरणक यांच्यासह आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जप्त केलेल्या मालमत्तांची कशा पध्दतीने लिलाव करावा, या लिलावाची सविस्तर कार्यपध्दती गतवर्षी स्थायी समितीने ठरवून दिलेली आहे. लिलाव करताना कशा प्रकारच्या अडचणी येतात, जाहिरात करताना मालमत्तांचे मुल्यांकन कसे करावे, 21 दिवसांची जाहिरात कशी द्यावी, मालमत्ता धारकांला बचावाची संधी देणे, त्याचबरोबर नैसर्गिक न्याय तत्त्वाचा वापर करणे, उच्च न्यायालयात, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची माहिती कर्मचाऱ्यांना देण्यात आली.

याचबरोबर अनेक आजारी उद्योगांच्या करवसुलीसाठी एनसीएलटीच्या तरतुदींचेही सविस्तर प्रशिक्षण कर्मचाऱ्यांना देण्यात आल्याचे सहाय्यक आयुक्त नीलेश देशमुख यांनी सांगितले. मालमत्तांची लिलाव प्रक्रिया प्रथमच राबवली जाणार आहे.त्यामुळे यामध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहू नये, यासाठी कर संकलन विभागाला प्रशिक्षण आयोजित करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या होत्या. यामुळे कर वसुली अधिक प्रभावी होईल, असा विश्वास असल्याचे आयुक्त शेखर सिंह म्हणाले.

Related posts

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विविध विकासकामांना प्रशासकांकडून मंजुरी.

pcnews24

पिंपरी चिंचवड मध्ये अजुन ही कोयत्याची दहशत.

pcnews24

लेखा परिक्षणासाठी आवश्यक माहिती उपलब्ध न केल्यास 25 हजार रुपये दंडात्मक कारवाई : PCMC आयुक्त शेखरसिंह.

pcnews24

प्राधिकरणाने मंजुर केलेला भूखंड निगडी व्यापारी संघटनेला मिळावा.निगडी व्यापारी संघटनेच्यावतीने, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना निवेदन.

pcnews24

महानगरपालिका:जल्लोष शिक्षणाचा पर्व २ चे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते उद्घाटन

pcnews24

रस्ते साफसफाई कामाची निविदा. आर्थिक भुर्दंड मात्र महापालिकेस ?

pcnews24

Leave a Comment