February 24, 2024
PC News24
हवामान

मुंबईला पावसाचा रेड अलर्ट जारी;सर्व शाळा-कॉलेजला उद्या सुट्टी जाहीर

मुंबईला पावसाचा रेड अलर्ट जारी;सर्व शाळा-कॉलेजला उद्या सुट्टी जाहीर

भारतीय हवामान खाते (मुंबई) यांच्या वतीने, मुंबई महानगराला आज रात्री ८ ते उद्या दुपारपर्यंत अतिमुसळधार पावसाचा (रेड अलर्ट) इशारा दिला आहे. आज सकाळपासूनच मुंबईत पावसाची संततधार सुरु आहे. दुपारनंतर पावसाचा जोर आणखी वाढला. गेल्या अनेक तासांपासून मुंबईत विना खंड पाऊस बरसतो आहे. गेल्या काही तासात मुंबईत १०० मिमीच्या आसपास पाऊल पडला आहे. तर पुढील काही तास मुंबईत जोरदार पाऊस कोसळणार असल्याची शक्यता आहे.

या पार्श्वभूमीवर, विद्यार्थ्यांची सुरक्षितता लक्षात घेता, महानगरपालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मुंबई महानगरातील महानगरपालिकेच्या तसेच सर्व शासकीय आणि खासगी प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच सर्व महाविद्यालयांना उद्या गुरुवार दिनांक २७ जुलै २०२३ रोजी सुट्टी जाहीर केली आहे. तसेच, सर्व मुंबईकर नागरिकांना विनंती करण्यात येते की, कृपया सर्वांनी सतर्क रहावे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे. तसेच, प्रशासनाच्या माध्यमातून वेळोवेळी देण्यात येणार्‍या सुचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Related posts

महाराष्ट्र:पुढील तीन दिवस कोकण आणि गोव्याला ‘ऑरेंज अलर्ट’-हवामान खात्याचा अंदाज.

pcnews24

मावळ: पवना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला, 98 मिली मीटर पावसाची नोंद

pcnews24

रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्यांना रेड अलर्ट

pcnews24

मुंबई, रत्नागिरीला यलो अलर्ट!!

pcnews24

देश : दिल्ली आणि मुंबईत एकाच वेळी मान्सून, 62 वर्षांनंतर पुन्हा तेच रेकॉर्ड

pcnews24

पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार.

pcnews24

Leave a Comment