February 24, 2024
PC News24
राजकारण

निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी पक्षाच्या दोन्ही गटांना नोटीस, तीन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश

निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी पक्षाच्या दोन्ही गटांना नोटीस, तीन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्या नंतर शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले आहेत. पक्षात फूट पडल्याने दोन्ही गटांनी आपलाच खरा पक्ष असल्याचा दावा निवडणूक आयोगाकडे केला होता. शरद पवार गटाने केलेल्या याचिकेची दखल घेतल्यानंतर निवडणूक आयोगाने अजित पवार गटाला नोटीस पाठवली होती. आता अशीच नोटीस अजित पवार गटाच्या याचिकेची दखल घेत शरद पवार गटाला पाठवण्यात आली आहे. येत्या तीन आठवड्यांत पक्षांसदर्भातील कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत.दोन्ही गटांनी एकमेकांना ही कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. “शरद पवार गट आणि अजित पवार गटाकडून आलेल्या याचिकांवर निर्णय घेण्याआधी निवडणूक आयोगाने दोन्ही गटांकडून उत्तर मागवले आहे. आम्ही विहित कालावधित आमचं उत्तर निवडणूक आयोगाला देऊ”, असंही या वरिष्ठ नेत्याने सांगितलं.शरद पवार गटातील वरिष्ठ नेत्याकडून ही नोटीस आली असल्याचे मान्य केले आहे. “अजित पवार गटाने विधानसभेतील सर्वाधिक संख्याबळाच्या आधारे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर दावा केला आहे, त्यावर उत्तर सादर करण्याबाबत नोटीस निवडणूक आयोगाकडून प्राप्त झाली आहे. त्यांच्या दाव्यावर उत्तर देण्याचे आणि संबंधित कागदपत्रे सादर करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिले आहेत. ही एक प्रक्रिया
असल्याने निवडणूक आयोगाकडे आम्हीही यासंदर्भात याचिका दाखल केली होती तेव्हा अजित पवार गटालाही निवडणूक आयोगाने अशी नोटीस पाठवली होती”, असं या वरिष्ठ नेत्याने सांगितलं.

Related posts

विधानसभा निवडणुकीत भाजपला 125 जागासह सर्वात मोठा पक्ष : नवीन सर्व्हे

pcnews24

योगी-शिंदे यांची भेट

pcnews24

‘ ई डी चा धाक… शरद पवार बाप..’ नाशिकमध्ये NCP कार्यालयावरून अजित पवार गट व शरद पवार गट आमने सामने, प्रचंड घोषणाबाजी.

pcnews24

IPL 2023: विराट कोहलीचा बंगळुरू संघ विजेतेपदाचा दुष्काळ संपवणार का? ‘या’ खेळाडूंवर असेल मदार

Admin

महाराष्ट्र:नवाब मलिकांच्या अडचणीत वाढ, ईडीकडूनआरोपांचा मसुदा सादर.

pcnews24

धनगर आरक्षण धनगर आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर; राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर उधळला भंडारा

pcnews24

Leave a Comment