February 24, 2024
PC News24
आंतरराष्ट्रीय

तिसऱ्या कारकिर्दीत भारत जगातील सर्वोत्तम तिसरी अर्थव्यवस्था होईल; मोदींचा निर्धार

तिसऱ्या कारकिर्दीत भारत जगातील सर्वोत्तम तिसरी अर्थव्यवस्था होईल; मोदींचा निर्धार

दिल्लीत प्रगती मैदानावरील आंतरराष्ट्रीय कन्व्हेन्शन सेंटर ‘भारत मंडपम’ चे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. ‘२०१४मध्ये सत्तेवर आलो त्या दहाव्या स्थानी होती. आता नऊ वर्षांत आपण पाचव्या स्थानावर आहोत. गेल्या नऊ वर्षांतील कामगिरीच्या आधारावर तिसऱ्या कारकिर्दीत भारत जगातील सर्वोत्तम तिसरी अर्थव्यवस्था असेल, असा विश्वास मी देशाला देतो मोदी म्हणाले. भारतीय अर्थव्यवस्था तिसऱ्या कारकिर्दीत जगात तिसरी अर्थव्यवस्था असेल आणि ही ‘मोदींची गॅरंटी आहे,’ असे जोर देवून आणि खात्रीने त्यांनी सांगितले.

आम्हाला आगामी २५ वर्षांत भारताला विकसित देश बनवण्याचे उद्दिष्ट साध्य करायचे आहे. देश प्रथम, नागरिक प्रथम या तत्त्वावर आम्ही हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काम करू आणि देशाला विकसित देश बनवू असेही त्यांनी सांगितले.

पूर्वेपासून पश्चिमेकडे, उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत, भारतातील पायाभूत सोयी बदलत आहेत. सर्वांत लांब रेल्वे पूल, सर्वाधिक उंचीवरील सर्वांत मोठा बोगदा भारतात आहे. भारत मंडपममध्ये ‘जी-२०’ची परिषद होईल, त्या वेळी जगाला भारताची उंचावलेली प्रतिमा दिसेल. असे ठणकावून पंतप्रधान – नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

विरोधकांवर टीका करताना मोदी म्हणाले, ‘सरकारच्या चांगल्या कामांवर नकारात्मक प्रतिक्रिया देणारी टोळी देशात आहे. चांगले काम थांबविण्यासाठी ही टोळी प्रयत्न करते. या लोकांनी भारत मंडपमचे काम थांबविण्याचाही प्रयत्न केला. प्रत्येक काम थांबविण्याची काही लोकांची मजबुरी आहे. अनेक खटले दाखल करण्यात आले. मला विश्वास आहे की काही काळाने हे लोक येथे येतील आणि व्याख्याने देतील किंवा कार्यक्रम करतील. ‘कर्तव्य पथा’ चे काम सुरू होते त्या वेळी देखील विरोध होता, वृत्तपत्रांमध्ये मथळे प्रसिद्ध होत होते. ब्रेकिंग न्यूज होत्या, न्यायालयातही हा मुद्दा उपस्थित केला गेला, मात्र तेव्हा तो बांधला आणि नंतर त्याला चांगला म्हटले तसेच मंडपमचा पण स्वीकार करील अशी मल खात्री आहे.’ कर्तव्य पथ ‘ हा सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाचा भाग आहे असे त्यांनी यावेळी सांगितले.

Related posts

IND vs SL Asia Cup 2023 Final : भारताने 8व्यांदा आशिया कप जिंकला, श्रीलंकेचा 10 गडी राखून पराभव केला, सिराजची कमाल

pcnews24

मुंबई मध्ये ४,३०० आमदारांनची वर्णी,काय आहे प्रकार?

pcnews24

पाकिस्तानातील काही गावे तालिबान्यानी केली हडप.

pcnews24

मोदी सरकारनं घेतला एक निर्णय; अमेरिकेत दुकानांमध्ये अक्षरश: झुंबड

pcnews24

डीआरडीओ वर कुरुलकरांच्या जागी जोशींची वर्णी,कोण आहेत जोशी ?

pcnews24

भारत न आल्यास पैसे द्या – पाकिस्तान क्रिकेट बोर्ड.

pcnews24

Leave a Comment