February 24, 2024
PC News24
जिल्हा

पुणे पोलिसांनी घडवली अद्दल, जिथे गुन्हा तिथेच धिंड!

पुणे पोलिसांनी घडवली अद्दल, जिथे गुन्हा तिथेच धिंड!

पुण्यातल्या सिंहगड रस्त्यावरील एका हॉटेलची तोडफोड करुन दहशत माजवणाऱ्या सराईत गुन्हेगाराचा पोलिसांनी माज उतरवला. जिथं भाईगिरी केली तिथेच त्याची धुलाई केली. पोलिसांनी घेतेलल्या आक्रमक भूमिकेचं नागरिकांकडून कौतुक होतंय.वैभव इक्कर (वय 23 रा. कोल्हेवाडी, खडकवासला)असे या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.आपण कुणाच्या बापाला घाबरत नाही, असं सांगत संबंधित गुन्हेगार खडकवासला किरकटवाडी शीव रस्ता परिसरात दहशत माजवित होता. त्या रस्त्यावरून त्याची धुलाई करत पोलिसांनी धिंड काढली.

रविवार दि. २३ रोजी त्याने किरकिटवाडी परिसरात साथीदारांच्या मदतीने हॉटेलची तोडफोड करत लुटमार केली होती. यावेळी त्याने पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला देखील केला होता.त्यानुसार पोलिसांनी मंगळवारी संध्याकाळी वैभव इक्कर आणि त्याच्या साथीदाराला बेड्या ठोकल्या आणि ज्या हॉटेलची तोडफोड केली होती. त्याठिकाणी त्याला आणून त्याची चांगलीच धुलाई केली.तसेच ज्या रस्त्यावर त्याने दहशत माजवली होती. त्याच रस्त्यावरून त्याची धिंड काढली. गेल्या काही दिवसांपासून तो सामान्य नागरिकांना कुठल्या न कुठल्या कारणाने त्रास देण्याचे काम करत होता. मात्र पोलिसांनी त्याची दहशत मोडून काढली आहे.

वैभव इक्कर आणि त्याच्या साथीदारांवर केलेल्या कारवाईमुळे पोलिसांच्या कामाचे नागरिकांनी कौतुक केले आहे. हवेली पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अनमोल मित्तल व इतर कर्मचाऱ्यांचे या कारवाईबद्दल कौतुक करण्यात येत आहे.

Related posts

पिंपरी चिंचवड शहरात रविवारी भरणार भव्य राजमाता जिजाऊ महिला संमेलन,महिलांना सहभागी होण्याचे आवाहन.

pcnews24

पुण्यात चिटकवले इस्त्राईल ध्वजाचे स्टीकर्स.

pcnews24

वडलांना मारल्याच्या रागातून केली निर्घृण हत्या.

pcnews24

आर्यन्स मार्शल आर्ट्स संघाला विजेतेपद !!

pcnews24

जांभूळवाडी तलावात हजारो माशांचा मृत्यू (व्हिडिओ सह)

pcnews24

राम मंदिरासाठी पाठवलेलं गडचिरोलीतील लाकूड 1000 वर्षांपर्यंत टिकणार, ऊन-पाऊस, किडीचा प्रभाव नसेल

Admin

Leave a Comment