March 1, 2024
PC News24
वाहतूक

भरावा लागेल 25 हजारांचा दंड!!अल्पवयीन मुलांच्या हाती गाडी देताना विचार करावा.

भरावा लागेल 25 हजारांचा दंड!!अल्पवयीन मुलांच्या हाती गाडी देताना विचार करावा.

पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेच्या वतीने गुरुवारी (दि. 27) एकाच वेळी सर्व वाहतूक विभागांतील शाळा,महाविद्यालयांच्या परिसरात एक विशेष मोहीम राबवली.यामधे जर पालकांनी अल्पवयीन मुलांना वाहने चालविण्यास दिली तर पालकांना त्याचा आर्थिक दंड सोसावा लागणार आहे. तब्बल 25 हजार रुपयांचा दंड पालकांकडून आकारला जाणार आहे. शहरात

अनेक अल्पवयीन मुले सध्या वाहने चालवताना आढळून आली आहेत. त्यामुळे अल्पवयीन वाहन चालकांच्या बाबतीत त्यांच्या पालकांवर कठोर कारवाई करण्याची भूमिका वाहतूक पोलिसांनी घेतली आहे.

पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेच्या पिंपरी,चिंचवड, निगडी, सांगवी, वाकड, हिंजवडी,देहूरोड, तळेगाव, तळवडे, भोसरी, दिघी-आळंदी, चाकण, बावधन, महाळुंगे या 14 विभागांमध्ये एकाच वेळी शाळा, महाविद्यालयांच्या परिसरात विशेष मोहीम राबविण्यात आली आहे.

Related posts

पुणे : चांदणी चौकातील नव्या उड्डाणपूलाचे नितीन गडकरी यांच्या हस्ते शनिवारी उदघाटन.

pcnews24

पुणे-मुंबई रेल्वे मार्गावर 2 दिवस विशेष ब्लॉक.

pcnews24

दुचाकी पार्सलसाठी पुणे रेल्वे स्टेशनवर ठेकेदारांकडून नागरिकांची लूट.

pcnews24

वंदे भारतसह एक्स्प्रेस ट्रेनच्या एक्झिक्युटीव्ह चेअर आणि एसी चेअरच्या तिकीट दरात २५ टक्क्यांपर्यंत कपात

pcnews24

पुणे जिल्हा:ट्राफिक पोलिसांकडे येणार अद्यावत कॅमेरे, वाहतूक नियम तोडणाऱ्यावर राहणार बारीक लक्ष, पुण्यात आता फोटोवरून कारवाई

pcnews24

महाराष्ट्र:पुणे होणार ‘EV’ हब! राज्यातील इतर जिल्ह्यातही होणार मोठी गुंतवणूक

pcnews24

Leave a Comment