February 24, 2024
PC News24
वाहतूक

पुणे:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोच्या तीन मार्गांचे उद्घाटन- १ऑगस्ट पासून,पुणे-पिंपरी चिंचवड शहरे मेट्रोने जोडली जाणार

पुणे:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रोच्या तीन मार्गांचे उद्घाटन- १ऑगस्ट पासून,पुणे-पिंपरी चिंचवड शहरे मेट्रोने जोडली जाणार.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 ऑगस्ट रोजी दुसऱ्या टप्प्यातील 11.66 किलोमीटर मार्गाचे लोकार्पण होणार आहे. त्यामुळे पुणे आणि पिंपरी-चिंचवड ही दोन शहरे मेट्रो मार्गाने देखील जोडली जाणार आहेत

दुसऱ्या टप्प्यात फुगेवाडी ते सिव्हील कोर्ट (6.91 किलोमीटर), गरवारे महाविद्यालय ते सिव्हील कोर्ट (2.38 किलोमीटर),सिव्हील कोर्ट ते रुबी हॉल (2.37 किलोमीटर) या तीन मार्गांचा दुसऱ्या टप्प्यात समावेश असणार आहे. या सर्व मार्गांसाठी सिव्हील कोर्ट मेट्रो स्टेशन हे इंटरचेंज असणार आहे. यामुळे वनाज ते पिंपरी-चिंचवड आणि रुबी हॉस्पिटल ते पिंपरी-चिंचवड तसेच वनाज या मार्गावर मेट्रोने प्रवास करता येणार आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरा दरम्यान मेट्रो सुरु झाल्याने दोन्ही शहरातील नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा एक सक्षम पर्याय उपलब्ध होणार आहे. पुणे शहरात जाण्यासाठी पिंपरी येथून तासाभराचा अवधी लागतो. त्यात वाहतूक कोंडी, प्रदूषण या समस्यांचा सामना करावा लागतो.शिवाय रेल्वे लोकलच्या फेऱ्या कमी असल्याने त्या बद्दल पिंपरी-चिंचवडकरांमध्ये काहीशी नाराजी आहे.

याआधी पुणे मेट्रो प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 12.2 किलोमीटर मार्गाचे लोकार्पण 6 मार्च 2022 रोजी झाले. गरवारे मेट्रो स्थानकात हा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. त्यानंतर मोदी यांनी मेट्रो मधून प्रवास करत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. मेट्रो सुरु झाल्याने पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांनी सुरुवातीला पर्यटन म्हणून मेट्रोने प्रवास केला. मात्र पिंपरीतून पुणे शहरात जाण्यासाठी मेट्रो उपयोगाची नसल्याने मेट्रोकडे दळणवळणाचे साधन म्हणून पाहिले गेले नाही.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरे एकमेकांना आता दुसऱ्या टप्प्यात जोडली जाणार असल्याने दोन्ही शहरातील नागरिकांना दळणवळणाचा एक सक्षम पर्याय उपलब्ध होणार आहे.

दुसऱ्या टप्प्यात फुगेवाडी ते सिव्हील कोर्ट (6.91 किलोमीटर), गरवारे महाविद्यालय ते सिव्हील कोर्ट (2.38 किलोमीटर), सिव्हील कोर्ट ते रुबी हॉल (2.37 किलोमीटर) या तीन मार्गांचा दुसऱ्या टप्प्यात समावेश असणार आहे. या सर्व मार्गांसाठी सिव्हील कोर्ट मेट्रो स्टेशन हे इंटरचेंज असणार आहे. यामुळे वनाज ते पिंपरी-चिंचवड आणि रुबी हॉस्पिटल ते पिंपरी-चिंचवड तसेच वनाज या मार्गावर मेट्रोने प्रवास करता येणार आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरादरम्यान मेट्रो सुरु झाल्यास दोन्ही शहरातील नागरिकांना सार्वजनिक वाहतुकीचा आणखी एक सक्षम पर्याय उपलब्ध होणार आहे. पिंपरी येथून पुणे शहरात जाण्यासाठी तासाभराचा कालावधी लागतो. त्यात वाहतूक कोंडी, प्रदूषण अशा समस्यांचा सामना करावा लागतो. तर लोकलच्या फेऱ्या कमी असल्याने लोकल बद्दल पिंपरी-चिंचवडकरांमध्ये काहीशी नाराजी आहे.

Related posts

पुणे:पीएमपीएमएल कडून बस मार्गात बदल

pcnews24

फुकट्यांकडून रेल्वेने केला 1 कोटी 42 लाखांचा दंड वसूल.

pcnews24

सावधान! जाणून घ्या व्हायरल झालेला वाहतूक दंड वसूलीचा बनावट संदेश- वाहतूक पोलिसांनी केले नागरिकांना सतर्क.

pcnews24

पुणे – वेल्हे – रायगड नवीन मार्ग, पैसे आणि वेळ वाचणार तर पर्यटन वाढणार

pcnews24

मेट्रोच्या तिकीट दरात विद्यार्थ्यांसाठी खास ऑफर

pcnews24

मेट्रोला पिंपरी चिंचवडकरांचा भरघोस प्रतिसाद-6दिवसात 50लाखांची कमाई.

pcnews24

Leave a Comment