February 24, 2024
PC News24
वाहतूक

कामशेत बोगद्याजवळ दरड कोसळली; पुणे मुंबई द्रुतगती मार्ग

कामशेत बोगद्याजवळ दरड कोसळली; पुणे मुंबई द्रुतगती मार्ग

आज गुरुवारी (दि. 27) रात्री पावणे नऊ वाजताच्या सुमारास पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावरील कामशेत बोगद्याजवळ दरड कोसळली आहे. या घटनेमुळे पुणे मुंबई मार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे.

घटनेची माहिती मिळताच आय आर बी, देवदूत आपत्कालीन पथक, खंडाळा, वडगाव महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या पथकांनी दरड हटवण्याचे काम सुरू केले आहे. दरम्यान या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.

यापूर्वी 24 जुलै रोजी पुणे मुंबई लेनवर आडोशी बोगद्याजवळ दरड कोसळली होती. यावेळी पुणे मुंबई मार्गावरील तीनही लेन वाहतुकीसाठी बंद केल्या होत्या. त्यावेळी दरडीचा काही मलबा डोंगरावर अडकून पडला होता. तो काढण्यासाठी आज गुरुवारी (दि. 27) दुपारी बारा ते दोन या कालावधीत द्रुतगती मार्गावर ब्लॉक घेण्यात आला होता.

पुणे, रायगड, मुंबई जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर कायम आहे. पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर हवामान खात्याने पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे द्रुतगती मार्गालगत असणाऱ्या डोंगरावरील दरड रस्त्यावर पडण्याच्या घटना सतत घडत आहेत.

Related posts

शहराकरिता मेट्रोला संलग्न अशी चक्राकार बस सेवा सुरु.

pcnews24

टाटा मोटर्सच्या Nexon EV चे फेसलिफ्ट व्हर्जनचे अनावरण

pcnews24

दुचाकी पार्सलसाठी पुणे रेल्वे स्टेशनवर ठेकेदारांकडून नागरिकांची लूट.

pcnews24

पुणे,पिंपरी,चिंचवड,करीता गुड न्यूज,सिंहगड एक्स्प्रेसबाबत मध्य रेल्वेचा मोठा निर्णय.

pcnews24

महाराष्ट्र:उद्या १२ ते २  मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई वाहिनी बंद !!

pcnews24

बॉम्बस्फोटाच्या धमकीने खळबळ… आरोपीला अटक.

pcnews24

Leave a Comment