February 24, 2024
PC News24
जीवनशैली

‘भाडेकरार ऑफलाइन नकोच’,-नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया.

‘भाडेकरार ऑफलाइन नकोच’,-नागरिकांची संतप्त प्रतिक्रिया

भाडेकरार ऑनलाइन करूनही पडताळणी आणि करारपत्र देण्यासाठी घरमालकासह भाडेकरूंना पोलीस ठाण्यात हेलपाटे मारण्याचा नवा फतवा त्रासदायक आहे. त्यामुळे ऑनलाइन करार करूनही पोलीस ठाण्यात हेलपाटे मारायचे का, असा संतप्त सवाल उपस्थित करण्यात येत आहे.‘भाडेकरार ऑफलाइन नकोच,’ अशी भूमिका घरमालक, भाडेकरूंसह ‘असोसिएशन ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडर’ने घेतली आहे.

या संदर्भात शहरात उडालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर ‘असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट एजंट्स’; तसेच ‘असोसिएशन ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडर’ यांच्या शिष्टमंडळाने पोलीस उपायुक्त आर. राजा यांची भेट घेऊन त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे. त्या शिष्टमंडळात ‘रिअल इस्टेट असोसिएशन’चे अध्यक्ष सचिन शिंगवी, अनिल पाटील, सचिन कात्रे, एस. के. शिंगवी, गणेश शेलार आणि ‘सर्व्हिस प्रोव्हायडर’च्या वतीने मंगेश पाटील, योगेश पपालिया, जितेंद्र वांबिरे उपस्थित होते.

नागरिकांनी पोलीस ठाण्यात येऊन कराराची प्रत आणि पोलीस पडताळणीची कॉपी घ्यावी, असे आदेश कोंढवा पोलिसांनी दिले आहेत. त्यानंतर पुण्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याच्या नावाने समाजमाध्यमांमध्ये अशा पद्धतीची पोस्ट फिरू लागली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक, भाडेकरू, घरमालक, रिअल इस्टेट एजंट आणि भाडे करार करणारे सर्व्हिस प्रोव्हायडरांनी आता पोलिस आयुक्तांनाच साकडे घातले आहे. ऑनलाइन भाडेकराराबाबत पोलिसांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी केली आहे.

पोलीस ठाण्यात हेलपाटे कशासाठी?पुण्यात वर्षाला सव्वालाख आणि महाराष्ट्रात सात लाखांहून अधिक ऑनलाइन भाडेकरारातून राज्य सरकारला कोट्यवधी रुपयांचा महसूल मिळतो. एकीकडे तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे एका ‘क्लिक’वर कोणतीही कागदपत्रे अथवा हस्तांतरण करणे शक्य झाले आहे. अशा परिस्थितीत ऑनलाइन भाडेकरार केल्यानंतर पोलिसांना हे करारपत्र मिळत नाही का? त्यामुळे पोलिस ठाण्यात हेलपाटे कशासाठी मारायचे? असा सवाल आता नागरिक उपस्थित करत आहे.

पुणे शहरात सुमारे ८५% घरमालक-भाडेकरू यांच्यात ‘ऑनलाइन’ करार झाले आहेत. भाडेकरार झाला पाहिजे. जे करीत नाहीत, त्यांना शिक्षाही झाली पाहिजे. पोलिस महासंचालक; तसेच पालकमंत्र्यांनी यापू्र्वी भूमिका स्पष्ट केली आहे. पोलिस ठाण्यात पुरेसे मनुष्यबळ नाही; तरीही पोलिसांना पडताळणी प्रत आणि करारपत्र देण्यासाठी नागरिकांनी पोलिस ठाण्यात यायला हवेच का? याबाबत पोलिसांनी भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी

असोसिएशन ऑफ रिअल इस्टेट एजंट्सचे अध्यक्ष,सचिन शिंगवी यांनी केली आहे

Related posts

चाकरमान्यांच्या सोयीची सिंहगड एक्सप्रेस वादामुळे चर्चेत.. एक्सप्रेसच्या पाच बोगी ही केल्या कमी.

pcnews24

चला निसर्ग पर्यटनाला;सातारा जिल्ह्यातील कास पठार पर्यटकांसाठी खुलं.

pcnews24

श्रीमंत दगडूशेठ हलवाई श्रींची डॉ.मोहन भागवत यांच्या हस्ते प्राणप्रतिष्ठापना तर मिरवणुकीत “जय श्रीराम”च्या घोषणा.

pcnews24

ठाणे, मुंबई परिसरात वाढत्या मोटार सायकल चोरी प्रकरण उघड,त्रिकुटास मुंब्रा पोलीसांकडून अटक.

pcnews24

रा.स्व.संघातर्फे उद्या पिंपरी चिंचवड शहरात पथसंचलन-२५ स्थानी स्वयंसेवकांचे सदंड पथसंचलन.

pcnews24

सतत मुलांची मागणी मोबाईल असेल तर?

pcnews24

Leave a Comment