February 24, 2024
PC News24
गुन्हा

पुणे:व्हीआयपी दौऱ्या दरम्यान पुण्यात पालिका अधिकाऱ्यांचा जोरदार राडा

पुणे:व्हीआयपी दौऱ्या दरम्यान पुण्यात पालिका अधिकाऱ्यांचा जोरदार राडा.

देशाचे गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरससंघचालक मोहन भागवत यांच्या व्हीआयपी दौऱ्या दरम्यान पुण्यात पालिका अधिकाऱ्यांनी जोरदार राडा केल्याचे समोर आले आहे. पालिका उपअभियंताने थेट पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याला चक्क काठीने मारहाण आणि शिवीगाळ केली आहे.

विश्रामबाग वाडा क्षेत्रीय अंतर्गत येणाऱ्या वैकुंठ स्मशानभूमी येथे आरएसएसचे सरसह कार्यवाह मदनदास देवी यांच्यावर अंत्यसंस्कार होणार होते.यावेळी गृहमंत्री अमित शहा आणि मोहन भागवत येणार असल्याने परिसरातील स्वच्छता आणि डागडुजी करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूचना दिल्या यावर संतापलेल्या उपअभियंताने थेट शिवीगाळ करत त्या अधिकाऱ्याला काठीने मारहाण केली.या प्रकरणात पालिकेची बदनामी होऊ नये म्हणून वरिष्ठ अधिकाऱ्याकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली नाही. मात्र, या सर्व प्रकाराची पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी गंभीर दखल घेतली आहे.

पालिका उपायुक्त सकपाळ यांच्याकडे आयुक्तांनी तातडीने अहवाल मागितला असून सदर मारहाण करणाऱ्या उपअभियंत्यावर आयुक्त निलंबनाची कारवाई करण्याची शक्यता आहे.

Related posts

महाराष्ट्रात दिवसाढवळ्या बंदूकईच्याजोरावर लूट (बघा व्हिडिओ)

pcnews24

एटीएसच्या तपास अहवालातून धक्कादायक माहिती समोर…शास्त्रज्ञ कुरुलकर ISIच्या संपर्कात..!

pcnews24

हडपसर:कर्जदार महिलेच्या घरी वसुलीसाठी गेलेल्या बँक कर्मचाऱ्यांची अश्लील शिवीगाळ करत दहशत.

pcnews24

MPSC परीक्षेत राज्यात तिसरी आलेल्या तरुणीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत,महाराष्ट्रातील धक्कादायक घटना

pcnews24

मावळात मोठा राजकीय खूनाचा कट-किशोर आवारे खूनाचा बदला.

pcnews24

पिंपरी:अवघा एक ‘क्लू ‘ मिळाला आणि सूत्रधार पोलिसांच्या जाळ्यात.

pcnews24

Leave a Comment