February 24, 2024
PC News24
शाळा/महाविद्यालय/शैक्षणिक

महाराष्ट्र:अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षा आता 3 ऑगस्ट रोजी होणार

महाराष्ट्र:अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर आज होणाऱ्या दहावी-बारावीच्या पुरवणी परीक्षा आता 3 ऑगस्ट रोजी होणार.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे शुक्रवारी (ता.28) होणारा दहावीचा पेपर पुढे ढकलण्यात आला आहे. राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी होणारा दहावीचा पेपर पुढे ढकलला असून आता 3 ऑगस्ट रोजी हा पेपर होणार आहे.

सध्या राज्य शिक्षण मंडळामार्फत जुलै-ऑगस्ट 2023 मधील दहावी-बारावीची पुरवणी परीक्षा सुरू आहे. यात दहावीची पुरवणी परीक्षा 18 जुलै ते 1 ऑगस्ट, तर बारावीची 18 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत होणार आहे. परंतु, सध्या राज्यात काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे शाळा, महाविद्यालयांना सुट्टीदेखील जाहीर केली आहे.

या पार्श्वभूमीवर दहावीच्या पुरवणी परीक्षेतील शुक्रवारी होणारा सामाजिक शास्त्रे पेपर-एक, इतिहास व राज्यशास्त्र हा पेपर पुढे ढकलला आहे. हा पेपर शुक्रवारी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत होणार होता.

आता 3 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत हा पेपर होईल,अशी माहिती राज्य मंडळाच्या सचिव अनुराधा ओक यांनी प्रकटनाद्वारे दिली आहे.

Related posts

पिंपरी चिंचवड:ओंकार पाटील याची ‘युनायटेड किंगडम’येथे पदव्युत्तर संशोधन साठी निवड

pcnews24

सतत मुलांची मागणी मोबाईल असेल तर?

pcnews24

महाराष्ट्रातील तिसरे आयआयएम पिंपरी-चिंचवडमध्ये सुरू करण्याची मागणी-भाजपा आमदार महेश लांडगे.

pcnews24

भोसरीतील गायत्री इंग्लिश स्कूलचा आदर्शवत उपक्रम!!

pcnews24

नामांकित बिझनेस महाविद्यालयातील 40विद्यार्थ्यांना अचानक चक्कर येण्याचा त्रास-,पालकवर्ग चिंतेत.

pcnews24

महापालिकेच्या विद्यार्थ्यांनी केला जर्मनी अभ्यास दौरा,आयुक्तां सोबत साधला संवाद.

pcnews24

Leave a Comment