February 24, 2024
PC News24
गुन्हा

पुण्यात आणखी दोन दहशतवाद्यांनाअटक; एक भूलतज्ज्ञ डॉक्टर आयसीसशी संबंधित.

पुण्यात आणखी दोन दहशतवाद्यांनाअटक; एक भूलतज्ज्ञ डॉक्टर आयसीसशी संबंधित

कोथरूड येथे पकडलेल्या दोन दहशतवाद्यांना राहण्यासाठी जागा देणाऱ्या कोंढव्यातील एकास राज्य एटीएसने अटक केली.अब्दुल कादीर दस्तगीर पठाण (वय ३२ रा, कोंढवा) असे ‘एटीएस’ने अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याला न्यायालयात हजर केले असता, जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. आर. कचरे यांच्या न्यायालयाने त्याला गुरुवारी पाच ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.कोथरूड येथे पकडलेल्या महंमद युनूस महंमद याकूब साकी (वय २४) आणि महंमद इम्रान महंमद युसूफ खान (वय २३, दोघे रा. चेतना गार्डन, मीठानगर, कोंढवा, मूळ रतलाम, मध्य प्रदेश) या दहशतवाद्यांचे वास्तव्य दीड वर्षांपासून कोंढवा परिसरातील मीठानगर येथील चेतना गार्डन या इमारतीत होते. दोघांची दहशतवादी कारवायांची माहिती असताना, पठाणने त्यांना राहण्यासाठी मदत केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

 

तसेच ‘इस्लामिक स्टेट’च्या शहरातील मॉड्यूल प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेने गुरुवारी डॉ. अदनान अली सरकार (वय ४३) याला कोंढवा परिसरातून अटक केली.सरकार ‘आयएस’च्या दहशतवादी कारवायांमध्ये; तसेच देशविरोधी कृत्यांसाठी विविध दहशतवादी संघटनांना मदत करीत होता, अशी माहितीही समोर आली आहे. तरुणांची माथी भडकवून त्यांना ‘आयएस’मध्ये भरती करून घेण्याचा या दहशतवाद्यांचा कट होता. ‘एनआयए’ने सरकार याच्या कोंढव्यातील घरावर छापा टाकून इलेक्ट्रॉनिक साहित्य आणि आयसिसशी संबंधित अनेक दस्तावेज जप्त केले. तो एक भुलतज्ञ डॉक्टर आहे त्याने बी जे मेडिकल कॉलेज मधून पदवी घेतली आहे. आज न्यायालयामध्ये हजार केले असता अदनान अलीला 10 दिवसांची एनआयए कस्टडी सुनावण्यात आली आहे.

Related posts

दारू पिऊन कुटुंबाला मारहाणकरांना वडिलांचा खूप

pcnews24

रहाटणी: सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेनी केली आत्महत्या

pcnews24

गोवंश तस्करी करणाऱ्या वाहनाचा तरुणांकडून पाठलाग.. तस्करांचा तरुणांवर हल्ला.. एका तरुणाचा जागीच मृत्यू

pcnews24

मोबाईल चोरी तपास प्रकरणी पोलिसांची चांगली कामगिरी.

pcnews24

एम.बी.बी.एस ॲडमिशनच्या बहाण्याने तब्बल २ कोटींची फसवणूक

pcnews24

चिंचवड:पत्नी व तिच्या घरच्यांकडून पतीचा घटस्फोटासाठी छळ, पतीची आत्महत्या

pcnews24

Leave a Comment