February 24, 2024
PC News24
सामाजिक

पिंपरी चिंचवड:ठेकेदारावर फौजदारी कारवाईची मागणी – सचिन काळभोर.

पिंपरी चिंचवड:ठेकेदारावर फौजदारी कारवाईची मागणी – सचिन काळभोर

निगडी येथील भक्ती शक्ती उड्डाणपूल व कै. मधुकर पवळे उड्डाणपूलाच्या मध्यभागी महापालिकेच्या माध्यमातून भुयारी मार्गाचे काम अतिशय संथ गतीने सुरू आहे. त्यामुळे सातत्याने अपघात होत आहेत. काम पूर्ण करण्याची नियोजित मुदत संपली तरी देखील या भुयारी मार्गाचे काम सुरू आहे.कामात दिरंगाई करणाऱ्या ‘ त्या ‘ ठेकेदारावर फौजदारी कारवाई करण्यात यावी अशी मागणी सचिन काळभोर यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.

रस्ता ओलांडण्यासाठी भुयारी मार्ग तयार करण्याचा कामाला विलंब होत असल्याने दोन्ही पुला दरम्यान रस्तात अडथळा निर्माण झाला असल्याने नागरिकांना एक ते दीड किलोमीटर वळसा घालावा लागत आहे. नागरिक रस्तावर उड्या मारून जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडत आहे. त्यामुळे येत्या काळात जिवितहानी होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.

केमिकल गॅस टँकर उलटून गेल्या महिन्यात याच ठिकाणी मोठा अपघात घडला होता. महापालिका पोलिस प्रशासन व अग्नीशमन दलाचे जवान तसेच तज्ञांच्या अथक परिश्रमातून मोठा अनर्थ टळला होता. त्यातच काल पुन्हा टँकर उलटून मोठा अपघात होण्याची दुसरी घटना याठिकाणी घडली आहे.

याठिकाणी ट्रॅफिक वार्डन व तात्पुरत्या सिग्नलची निर्मिती करून,येथे असलेल्या धोकादायक गतिरोधकांची उंची कमी करावी. अशा आवश्यक त्या उपाययोजना करून नागरिकांच्या जीवाशी चालवलेला खेळ तात्काळ थांबवण्यात यावा.

भुयारी मार्गाच्या कामाच्या कालावधीत काम पूर्ण न करणार्‍या ठेकेदारावर कठोर कायदेशीर फौजदारी कारवाई करून गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांनी महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

Related posts

दहावीचा निकाल पाहण्यासाठी हे करा दहावी परीक्षेचा निकाल आज (2 जून) जाहीर होणार आहे.

pcnews24

डेंग्यू,चिकुनगुन्या आणि हिवताप याबाबत शहरवासियांनी काळजी घ्यावी – महानगरपालिकेचे आवाहन.

pcnews24

महागाई भत्ता थकबाकीसह मिळणार.शिंदे सरकार.

pcnews24

चला निसर्ग पर्यटनाला;सातारा जिल्ह्यातील कास पठार पर्यटकांसाठी खुलं.

pcnews24

आतिफ अस्लमवर चाहत्याने उधळले पैसे अन्…(व्हिडिओ सह)

pcnews24

स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ निगडी यांच्यातर्फे सावरकर जयंती रक्तदान करून साजरी

pcnews24

Leave a Comment