February 24, 2024
PC News24
तंत्रज्ञान

देश:सुक्या कचर्‍यापासून वीजनिर्मिती प्रकल्प अखेर कार्यान्वित:पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

देश:सुक्या कचर्‍यापासून वीजनिर्मिती प्रकल्प अखेर कार्यान्वित:पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन

 

महापालिकेचा मोशी येथे 81 एकर जागेत असलेल्या कचऱ्या डेपोतील सुक्या कचर्‍यापासून वीजनिर्मितीचा (वेस्ट टू एनर्जी) प्रकल्प अखेर कार्यान्वित करण्यात आला आहे. या प्रकल्पाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी (दि.1) ऑनलाइन पद्धतीने करण्यात येणार आहे.संपूर्ण शहराचा कचरा येथे आणून टाकला जात असल्याने दररोज 700 टन सुक्या कचर्‍याची विल्हेवाट येथे होणार आहे.

1991 मधे हा डेपो सुरू झाल्या पासून येथे कचरा जमा होत आहे.कचर्‍याचे अनेक वर्षांपासूनचे ढीग बायोमॉयनिंगद्वारे हटविले जात आहेत. या कचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत.जमा होणाऱ्या ओल्या कचर्‍यापासून खत आणि प्लास्टिक कचर्‍यापासून इंधन तयार केले जाते. दररोज साधारण 1 हजार 100 टन कचरा जमा होत आहे. त्यात ओला कचरा 300 टन तर, सुका कचरा 700 व इतर कचरा 100 टन असतो.

शुद्ध स्वरूपातील सुक्या कचर्‍यापासून वीजनिर्मितीचा प्रकल्प उभारण्याचा निर्णय महापालिकेने घेतला.प्रकल्प तयार करण्याची मुदत 18 महिने होती. मात्र, कोरोना महामारीमुळे तसेच, परदेशातून यंत्रसामुग्री आणण्यास विलंब झाल्याने प्रकल्पाचे रखडलेले काम नुकतेच पूर्ण झाले आहे.

जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून घेण्यात येत असलेल्या प्राथमिक चाचणीत 1.07 मेगा वॅट वीजनिर्मिती येथे केली जात आहे. टप्प्याटप्प्याने वीजनिर्मिती वाढविण्यात येणार आहे. येथील प्रकल्पात तयार होणारी वीज महावितरणला देण्यासाठी महावितरण कंपनीसोबत चर्चा सुरू असून ही प्रक्रिया लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.

सर्वसाधारण सभेकडून 12 एप्रिल 2018 लावेस्ट टू एनर्जी प्रकल्पास मंजुरी देण्यात आली. डिजाईन, बिल्ट,ऑपरेट अ‍ॅण्ड ट्रॉन्सपोर्ट’ (डीबीओटी) या तत्त्वावर हा प्रकल्प अन्टोरी लारा एन्व्हायरो व ए. जी. एन्व्हायरो कंपनी या दोन कंपन्या चालविणार आहेत.

प्रकल्पाचा एकूण खर्च 208 कोटी 36 लाख असून, देखभाल, दुरुस्ती व संचालन संबंधित ठेकेदार कंपनी 21 वर्षे करणार आहे. त्यासाठी कंपनी दररोज 1 हजार टन क्षमतेचा मटेरिअल रिकव्हरी फॅसिलिटी (एमआरएफ) प्रकल्प चालविणार आहे.प्रकल्प उभारण्यासाठी पालिकेने कंपनीस 50 कोटींचे आर्थिक सहाय दिले आहे.

प्रकल्पासाठी जागेचे भाडे म्हणून पालिका वर्षाला 1 रुपया नाममात्र भाडे घेणार आहे. प्रकल्पात शुद्ध स्वरूपातील 700 टन सुक्या कचर्‍यापासून दररोज 14 मेगावॅट वीजनिर्मिती केली जाणार आहे. त्यातील 13.80 मेगावॅट वीज पालिका 5 रुपये प्रती युनिट या दराने 21 वर्षे विकत घेणार आहे.ती वीज पालिकेकडून निगडी,सेक्टर क्रमांक 23 येथील जलशुद्धीकरण केंद्र,सांडपाणी शुद्धीकरण केंद्र आदी ठिकाणी वापरली जाणार आहे. उर्वरित शिल्लक वीज कंपनी प्रकल्प चालविण्यासाठी वापरणार आहे.कचर्‍याची विल्हेवाट लागून पालिकेस स्वस्त दराने वीज मिळणार केवळ 5 रुपये प्रती युनिट वीज मिळाल्याने महापालिकेच्या वीजबिलात सुमारे 35 ते 40 टक्के बचत होणार आहे.

Related posts

चंद्रावरून आला प्रज्ञान रोव्हरचा संदेश.

pcnews24

ISRO; चांद्रयान-३ : प्रज्ञान रोव्हरकडून मोहीम यशस्वी.

pcnews24

BSNL ला 89,000 कोटी रुपयांचे पॅकेज

pcnews24

देश:चांद्रयान-३चा चंद्राच्या कक्षेत प्रवेश;महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे पार पडला.

pcnews24

Google Pay, PhonePay युजर्ससाठी गुडन्यूज!!

pcnews24

एनक्रिप्टेड मेसेजिंग अँप्सवर मोठ्या प्रमाणावर बंदी घालणारा भारत हा पहिला लोकशाही देश.

pcnews24

Leave a Comment