February 24, 2024
PC News24
महानगरपालिका

पिंपरी चिंचवड:बोऱ्हाडेवाडी सदनिकांचे प्रातिनिधीक स्वरूपात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हस्तांतरण.

पिंपरी चिंचवड:बोऱ्हाडेवाडी सदनिकांचे प्रातिनिधीक स्वरूपात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हस्तांतरण.

डुडुळगाव येथील साकारण्यात येणाऱ्या गृहप्रकल्पाचे भूमिपूजन, बोऱ्हाडेवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राबवण्यात आलेल्या गृह प्रकल्पांतील सदनिकांचे लाभार्थ्यांना हस्तांतरण तर मोशी येथे उभारण्यात आलेल्या वेस्ट टू एनर्जी अशा विविध प्रकल्पाचे उद्घाटन भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 1 ऑगस्टला शिवाजीनगर येथील पोलीस परेड मैदानावर दूरदृश्य प्रणालीद्वारे करण्यात येणार आहे.

बोऱ्हाडेवाडी येथे प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 1288 सदनिका उभारण्यात आल्या आहेत. या प्रकल्पातील लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात सदनिकांचे हस्तांतरण प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या प्रकल्पाची किंमत 127.70 कोटी रुपये इतकी आहे.

डुडुळगाव येथे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत महापालिकेच्या वतीने 1990 सदनिका उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पाचे भूमिपूजन प्रधानमंत्री मोदी यांच्या हस्ते केले जाणार आहे.या प्रकल्पासाठी 188.18 कोटी रुपये खर्च होणार आहेत.

महानगरपालिकेच्या वतीने घनकचरा व्यवस्थापनासाठी सुक्या कचऱ्यापासून 700 टी.पी.डी क्षमतेच्या प्रकल्पामधून 14 मेगावॅट वीज निर्मिती प्रकल्प उभारण्यात येणार आहे.त्याचे उद्घाटन पी एम द्वारे होणार आहे,ज्यामध्ये 1000 टी.पी.डी क्षमतेच्या मटेरियल रिकव्हरी फॅसिलीटी व 500 टी. पी. डी क्षमतेच्या कंपोस्ट प्लांटचा समावेश आहे.कचऱ्यापासून वीजनिर्मिती हा महाराष्ट्रातील पहिला प्रकल्प आहे. 700 मेगा टन सुक्या (Pimpri ) कचऱ्यापासून 14 मेगावॅट वीजनिर्मिती करणे हे या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. त्यापैकी 12 मेगावॅट तयार झालेली वीज महानगरपालिका वापरणार आहे.हा प्रकल्प डीबीओटी तत्वावर पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप नुसार ऍन्थोनी लारा रिन्युएबल एनर्जी प्रायवेट लिमिटेड यांच्या मार्फत विकसित केला गेला असून 21 वर्षे कालावधीसाठी चालविण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी 300 कोटी रुपये खर्च झालेला आहे.

महापालिकेचा हा महत्वकांशी प्रकल्प कार्यान्वित होत असून यामुळे कचरा डंपिंगसाठी अधिकच्या जागेची आवश्यकता भासणार नाही. या प्रकल्पामुळे महापालिकेच्या वीज बिलात सुमारे 35 टक्के ते 40 टक्के बचत होणार आहे.

Related posts

पिंपरी चिंचवड : अजूनही 700 कोटींची मालमत्ता कर थकबाकी, 25 हजार रुपयांहून अधिक थकबाकी असलेल्यांना जप्तीच्या नोटिसा

pcnews24

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या ‘विना वाहन वापर’ धोरणास देशात प्रथम क्रमांक.

pcnews24

शेगडी, सिलेंडरच्या साठ्यावर पोलिसांचा मोठा छापा,देशी विदेशी गावठी दारुसाठी वापर

pcnews24

शिक्षकांसाठी खुषखबर !! पिंपरी चिंचवड महानगर पालिकेत 209 पदांवर भरती- ऑफलाईन पद्धतीने करा अर्ज

pcnews24

पिंपरी चिंचवड: स्वच्छता ही सेवा उपक्रमातंर्गत एक तास स्वच्छता मोहिमेत ४० हजारांहून अधिक नागरिकांचा सहभाग.

pcnews24

बकरी ईदची सार्वजनिक सुट्टी उद्या…सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने आदेश जारी

pcnews24

Leave a Comment