February 24, 2024
PC News24
जीवनशैली

पिंपरी : आरएसएस : स्वयंसेवकाच्या घरी सरसंघचालक रमले

पिंपरी : आरएसएस : स्वयंसेवकाच्या घरी सरसंघचालक रमले

पिंपरीतील संतl तुकारामनगर येथील स्वयंसेवक संदीप जाधव यांच्या घरी सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतीच त्यांच्या घरी सदिच्छा भेट दिली. दोन तास ते त्यांच्या घरी रमले होते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) म्हटले की सर्वांना स्वयंसेवकांची शिस्त आठवते. संघटनेत काम करताना संघटनेतील सर्वोच्च व्यक्ती आपल्या घरी यावी अशी सर्वांची इच्छा असते. सर्वोच्च व्यक्ती घरी आल्याचा आनंद गगनात मावेनासा होतो. तोच आनंद संदीप जाधव व त्यांच्या कुटुंबीयांना आला.

अमृतानुभुव…एका सामान्य संघ कार्यकर्त्यांच्या घरी संघाच्या कुटुंब प्रमुखाने अगदी निर्हेतुक येणे. घरच्या सर्वांशी मनमोकळी चर्चा करणे, कुठेही एक असामान्य व्यक्तिमत्व घरी आल्याची जाणीव होऊ न देण, घरी बनविलेल साधसुध जेवण सर्वासोबत घेण. हे सर्व अचंबित करणार आहे, कल्पनेपलीकडच आहे.

याचाच अनुभव आम्हा जाधव कुटुबियांना 5 जुलै रोजी आला. निमित्त होत प.पु .सरसंघचालकांच आमच्या घरी अनौपचारिक येण.त्या मंतरलेल्या दोन तासांच्या सहवासामधून आम्ही सर्व कुटुंबीय अजुनही बाहेर पडलेलो नाही. आणि पडणार ही नाही. भविष्यात संघकामात सतत कार्यरत रहाण्यासाठी आवश्यक ती सर्व उर्जा वेचण्याचा आटोकाट प्रयत्न मी तरी केला आहे. आणि हेच संचित मला आयुष्यभर पुरेल अशी पोस्ट संदीप जाधव यांनी आपल्या फेसबुक पोस्ट केली आहे.

संदीप जाधव हे अनेक वर्षांपासून संघ स्वयंसेवक आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात ते संघाचे कार्य करतात. सरसंघचालक मोहन भागवत यांनी नुकतीच (५ जुलै) रोजी जाधव यांच्या घरी सदिच्छा भेट दिली.

अनौपचारिकपणे सरसंघचालक हे जाधव यांच्या घरी आले. सरसंघचालक भागवत यांनी जाधव यांच्या कुटुंबातील सदस्यांसोबत आपुलकीने संवाद साधला. त्यामुळे जाधव कुटूंबीय आनंदाने हरखून गेले.

Related posts

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने अक्षय तृतीया आणि जागतिक वसुंधरा दिनानिमित्त वृक्षारोपण.

pcnews24

चिंचवड:राजमाता जिजाऊ महिला संमेलनात मातृशक्तीचा जागर,हजारो महिलांचा उत्स्फूर्त सहभाग

pcnews24

लिंडा याकोरिनो ट्विटरच्या नवीन CEO ?

pcnews24

पदपथ घेणार मोकळा श्वास, जाणून घ्या पालिकेचे नवीन धोरण.

pcnews24

रा.स्व.संघातर्फे उद्या पिंपरी चिंचवड शहरात पथसंचलन-२५ स्थानी स्वयंसेवकांचे सदंड पथसंचलन.

pcnews24

नवले ब्रीज ठरतोय Accident point.स्वामीनारायण मंदिर येथे भीषण अपघात

pcnews24

Leave a Comment