February 24, 2024
PC News24
राजकारण

पिंपरी चिंचवड:भिडेगुरुजी विरोधात काँग्रेसचे पिंपरीत आंदोलन.

पिंपरी चिंचवड:भिडेगुरुजी विरोधात काँग्रेसचे पिंपरीत आंदोलन

(ता.२७) राष्ट्रपिता महात्मा गांधींविषयी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक मनोहर कुलकर्णी ऊर्फ संभाजी भिडेगुरुजी यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे तीव्र पडसाद सध्या राज्यभर सर्वत्र उमटत आहेत. त्या विरोधात भिडेंच्या अटकेची मागणी विरोधी पक्षांनी केली आहे. पिंपरीतही कॉंग्रेसने भिडेंविरोधात तीव्र आंदोलन करीत त्यांच्या प्रतिमेला (ता.२९) जोडे मारून त्यांचा निषेध केला.

शहराध्यक्ष डॉ. कैलास कदम यांच्या नेतृत्वात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात कॉंग्रेसच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. भिडेगुरुजींच्या अटकेची मागणी यावेळी करण्यात आली. माजी महापौर कविचंद भाट, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर, महिला अध्यक्षा सायली नढे, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष ज्ञानेश्वर मलशेट्टी, छावा संघटनेचे धनाजी येळकर पाटील, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष सतीश काळे सहभागी झाले होते. यावेळी भिडेंच्या बरोबरच मोदी-शहा आणि भाजप सरकारविरोधातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

Related posts

सुप्रीम कोर्टात कोणकोणत्या याचिका आहेत ? – सत्तासंघर्षाप्रकरणी प्रमुख 4 याचिका कोर्टात दाखल आहेत.११:४० वा.निकाल.

pcnews24

पंतप्रधान मोदींकडून नारीशक्ती वंदन विधेयकाची घोषणा;ईश्वराने अशी अनेक पवित्रं काम करण्यासाठी माझी निवड केली आहे

pcnews24

निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादी पक्षाच्या दोन्ही गटांना नोटीस, तीन आठवड्यांत उत्तर सादर करण्याचे निर्देश

pcnews24

शेअर बाजारातील व्यवहार तेजीसह बंद; ‘या’ स्टॉक्सने बाजार सावरला

Admin

भाजपला मुळासकट फेकून दिले…कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा हल्लाबोल

pcnews24

‘मायलेकाची ‘अशी’ भेट पाहून सर्वांचे मन हेलावून गेले’,सरकारला जेरीस आणणारे जरांगे पाटील यांना आईला पाहताच कंठ दाटून आला..

pcnews24

Leave a Comment