February 24, 2024
PC News24
न्यायव्यवस्था

देश:उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदी देवेंद्र कुमार उपाध्याय यांची नियुक्ती.

देश:उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदी देवेंद्र कुमार उपाध्याय यांची नियुक्ती.

शनिवारी (दि. 29 जुलै) राजभवन येथे अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायाधीश देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. या शपथविधी समारंभामध्ये राज्यपाल रमेश बैस यांनी उपाध्याय यांना पदाची शपथ दिली.

शपथविधी सोहळ्याला राज्यपालांच्या पत्नी रामबाई बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, न्या. उपाध्याय यांचे कुटुंबिय, लोकायुक्त विद्यासागर कानडे, राज्य मानवाधिकार आयुक्त न्या. के के तातेड, राज्य निवडणूक आयुक्त युपीएस मदान, मुंबई व अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायाधीश तसेच अलाहाबाद उच्च न्यायालयातील न्यायाधीश व वकील उपस्थित होते.

राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी न्या. उपाध्याय यांच्या नियुक्तीबाबत राष्ट्रपतींची अधिसूचना वाचून दाखवली. राष्ट्रगीत व राज्यगीताने शपथविधी सोहळ्याची सुरुवात झाली व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

Related posts

ग्राहक मंच तर्फे SBI ला 2 लाखांचा दंड

pcnews24

हाणामारी ! वकील महिला-पुरुष कोर्टातच भिडले(व्हिडिओ सह)

pcnews24

ग्राहकांना मोबाईल नंबर सक्तीने मागू नका

pcnews24

पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट्स असोसिएशनच्या पहिल्या महिला अध्यक्षा ॲड प्रमिला गाडे..

pcnews24

न्यायमूर्ती रमेश डि धानुका यांनी घेतली शपथ

pcnews24

मुंबई:रहिवासी संकुलात विनापरवानगी ईदची कुर्बानी चुकीची.

pcnews24

Leave a Comment