February 24, 2024
PC News24
गुन्हा

पुणे:कोथरूडमध्ये अटक केलेल्या दहशतवाद्यांचे धागेदोरे रत्नागिरीपर्यंत; इंजिनीअर आरोपी अटकेत.

पुणे:कोथरूडमध्ये अटक केलेल्या दहशतवाद्यांचे धागेदोरे रत्नागिरीपर्यंत; इंजिनीअर आरोपी अटकेत.

कोथरूडमध्ये अटक केलेल्या दहशतवाद्यांना; तसेच त्यांना राहण्यास खोली देणाऱ्याला, आर्थिक मदत पुरविणाऱ्या मॅकेनिकल इंजिनीअरला राज्य दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) रत्नागिरी येथून अटक केली. निसाब नसरुद्दीन काझी (वय २७) असे आरोपीचे नाव आहे. खासगी कंपनीत काम करणाऱ्या काझीला १५ लाख रुपये वार्षिक उत्पन्न आहे. त्यातील काही रक्कम तो दहशतवादी कारवायांसाठी देत असल्याची माहिती ‘एटीएस’ला मिळाली आहे.

दुचाकी चोरण्याच्या तयारीत असलेल्या महंमद युनूस महंमद याकू साकी , महंमद इम्रान महंमद युसूफ खान व या दोघांना आश्रय दिल्याच्या आरोपावरून मूळच्या गोंदियामधील आणि सध्या कोंढवा परिसरात वास्तव्याला असलेल्या अब्दुल कादिर दस्तगीर पठाण यांना अटक केल्यानंतर या तिघांची एकत्रित चौकशी सध्या सुरू आहे. रत्नागिरीतील एकाने आर्थिक रसद पुरवल्याची माहिती चौकशीदरम्यान पुढे आली. संशयिताला चौकशीसाठी ‘एटीएस’ने बोलावले होते. चौकशीत त्याने आर्थिक मदत पुरवली असल्याचे स्पष्ट झाल्याने त्याला अटक करण्यात आली. या तपासात या चौघांच्या संपर्कात असलेल्या परराज्यातील अजून एकाची माहिती पुढे आली आहे.

रत्नागिरी येथील काझी यास शनिवारी न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. अटक करण्यात आलेले आरोपी वेगवेगळ्या राज्यातील आहेत. ते कोंढव्यात वास्तव्यास आल्यानंतर संपर्कात आले. काझी याचे बँक खाते तपासले असता त्याने पठाण यास पैसे पाठविल्याचे निदर्शनास येत आहे असा युक्तिवाद सरकारी वकील विजय फरगडे यांनी केला. आरोपीच्या वतीने अ‍ॅड. यशपाल पुरोहित यांनी ही रक्कम लाखोंच्या स्वरूपात नसल्याने काझी याने आर्थिक मदत केली असे निष्पन्न होत नाही असा युक्तिवाद अ‍ॅड. पुरोहित यांनी केला. न्यायालयाने काझी यास पाच ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.

Related posts

पुष्पास्टाईल सागवानाचे इंद्रावती नदीत डम्पिंग..

pcnews24

प्रतिस्पर्धी कंपनीला गोपनीय माहिती देवून कंपनीची फसवणूक

pcnews24

आणि जावयाने पाडले सासूचे 2 दात,काय घडलाय नक्की प्रकार?

pcnews24

दारू पिऊन कुटुंबाला मारहाणकरांना वडिलांचा खूप

pcnews24

पुण्यातील मंचर येथे लव्ह जिहाद?..गोपीचंद पडळकरांचे गंभीर आरोप

pcnews24

सुशांतच्या मृत्यूप्रकरणी अजूनही आरोपपत्र नाही

pcnews24

Leave a Comment