February 24, 2024
PC News24
अपघात

कोकणात ट्रेकिंगसाठी गेलेल्या कारचा अपघात दाट धुक्याने तिघांचा मृत्यू तर एक बचावला

कोकणात ट्रेकिंगसाठी गेलेल्या कारचा अपघात दाट धुक्याने तिघांचा मृत्यू तर एक बचावला

भोर तालुक्यातील वरांधा घाट परिसरात असणाऱ्या नीरा देवघर धरणात चार चाकी कोसळली आहे. त्यात वारवांड – शिरगाव हद्दीत असलेल्या वळणावर धुक्याचा अंदाज न आल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून गाडी थेट ३०० फूट खोल दरीत कोसळली. या गाडीत चार जण प्रवास करत होते. त्यातील तिघे बुडाले असून एकजण बचावला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अक्षय रमेश धाडे( २७), स्वप्नील परशुराम शिंदे (२८), तरुणी हर्षप्रीत हरप्रीतसिंग बांबा (३०) यांचा गाडीत अडकल्याने बुडून मृत्यू झाला. तर संकेत विरेश जोशी हा गाडीच्या बाहेर फेकला गेल्याने तो बचावला. हे सर्वजण वरांधा घाट मार्गे कोकणात ट्रेकिंगसाठी जात असल्याची माहिती समोर आली आहे. आज सकाळच्या सुमारास भोर तालुक्यातील वरांधा घाट मार्गे हे चौघेजण कोकणात जाण्यासाठी चारचाकी क्र. एमएच १४ एचडी ३९८४ या गाडीने निघाले होते. मात्र सकाळच्या वेळी घाट परिसरात प्रचंड धुके होते. त्यामुळे चालकाला एका वळणाचा धुक्यामुळे अंदाज न आल्याने त्यांची गाडी थेट ३०० फूट खोल धरणाच्या पात्रात जाऊन बुडाली.

अपघाताची माहिती मिळताच भोईराज जल आपत्ती पथक, सह्याद्री रेस्क्यू फोर्स भोर-पुणे यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून शोध कार्य सुरू केले. यात तरुणी हर्षप्रीत बांबा व तरुण अक्षय धाडे यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले असून एकाचा शोध अद्यापही सुरू आहे.

पुणे जिल्ह्यात सध्या दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढले आहे. घाट माथ्यावर तर मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यातच पुणे आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या वरंधा घाट सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. मात्र घाट बंद असताना काही नागरिक प्रशासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखवून वरंधा घाटातून धोकादायक पद्धतीने प्रवास करताना पहायला मिळत आहे. या चौघांनी देखील अशाच पद्धतीने प्रवास केल्यामुळे त्यांच्या जीवावर बेतले आहे

अपघातामध्ये मृत्यू पावलेल्या अक्षय व हर्षप्रीतचा साखरपुडा झाला होता. विवाहापूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली. अक्षयला समाजकार्याची आवड होती. वाडी-वस्तीवररील मुलांना मदत करण्यासाठी तो पुढे असायचा. येत्या १५ ऑगस्ट रोजी पुण्याजवळच्या वस्तीवर गरजूंना देण्यासाठी अक्षयने धान्याचे किट घरी आणून ठेवल्याचे सांगताना त्याच्या वडिलांना अश्रू आवरत नव्हते.

Related posts

पुणे:स्वयंचलित सिग्नल यंत्रणा व इतर कामानिमित्ताने शनिवार रविवार लोकल बंद,पहा अधिक माहिती.

pcnews24

निगडित पलटी झाला गॅस टँकर

pcnews24

पुणे नाशिक महामार्गावर धावत्या शिवशाही बसला आग..सर्व प्रवासी सुखरूप

pcnews24

केदारनाथ : गौरीकुंड येथे दरड कोसळली;19 जण बेपत्ता

pcnews24

कल्याण – भीमाशंकर( पुणे) बसला अपघात,बस२० फूट दरीत कोसळली

pcnews24

कोथरुड :‘Royal exit’ची पोस्ट… अन् पोलिसांनी वाचवला एक जीव.

pcnews24

Leave a Comment