February 24, 2024
PC News24
देश

ITR भरण्यासाठी शेवटचा १ दिवस बाकी;मुदत वाढण्याची फारशी आशा नाही

ITR भरण्यासाठी शेवटचा १ दिवस बाकी;मुदत वाढण्याची फारशी आशा नाही

आयकर रिटर्न भरण्याची मुदत अवघ्या एका दिवसांत संपत आहे. तुम्ही अद्याप इन्कम टॅक्स रिटर्न (ITR) भरला नसेल, तर हे काम लगेच करा. हाती आलेल्या माहितीनुसार, सरकारने अलिकडच्या आठवड्यात हे देखील स्पष्ट केले आहे की ज्या करदात्यांची खाती बंद आहेत किंवा त्यांचे ऑडिट करणे आवश्यक नाही अशा करदात्यांना ३१ जुलै ही तारीख अंतिम असेल आणि ती वाढवण्याचा विचार करण्यात येणार नाही.

करदात्यानी विक्रमी संख्येने मूल्यांकन वर्ष २०२३-२४ साठी त्यांचे विवरणपत्र आधीच भरले आहे. जर तुम्ही अद्याप ITR दाखल केला नसेल, तर कर संबंधित कोणताही त्रास टाळण्यासाठी तुम्ही प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण केली पाहिजे. मूल्यांकन वर्ष २०२३-२४ साठी आयकर रिटर्न भरण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०२३ आहे. शेवटच्या क्षणी ITR भरताना त्रास होऊ शकतो.प्राप्तिकर विभाग दररोज करदात्यांना संदेश पाठवत आहे की करदात्यांनी शक्य तितक्या लवकर ITR भरावे. मागच्या वेळेप्रमाणे या वेळीही आयटीआर भरण्याची मुदत वाढवण्याची आशा नाही. तुम्ही घरबसल्या १० मिनिटांत तुमचा ITR ऑनलाइन भरू शकता. गेल्या वेळी सुमारे सहा कोटी करदात्यांनी आयटीआर भरले होते. गेल्या दोन दिवसांत सुमारे दोन कोटी आयटीआर दाखल करण्यात आले आहेत.

Related posts

केंद्र:पीव्हीसी आधार कार्ड, नक्की काय…

pcnews24

नवी दिल्ली:नको QR Code नको पिनची झंझट, नवीन फिचरने करता येणार पेमेंट झटपट

pcnews24

2,000 रुपयांच्या नोटा होणार बंद

pcnews24

आंतरजातीय विवाह मान्य नसल्याने बळजबरीने मुलीला परत आणले (व्हिडिओ सह)

pcnews24

महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाचा “निकाल’ लांबणीवर,सुप्रीम कोर्टातील ४ न्यायाधीशांना कोरोनाची लागण.

pcnews24

दक्षिण भारतीय राज्यातून भाजप बाहेर !

pcnews24

Leave a Comment