February 24, 2024
PC News24
राजकारण

शरद पवार मोदींसोबत स्टेज वर; कार्यकर्ते मात्र आंदोलनाच्या पवित्र्यात.

शरद पवार मोदींसोबत स्टेज वर; कार्यकर्ते मात्र आंदोलनाच्या पवित्र्यात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी पुणे शहरात येत आहेत. लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्यानंतर तो स्वीकारण्यासाठी नरेंद्र मोदी पुण्यात असणार आहेत. दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस सह काँग्रेस आणि शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आंदोलन करणार असल्याचे जाहीर केले आहे. दुसरीकडे मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार हे स्वतः नरेंद्र मोदींसोबत व्यासपीठावर उपस्थित राहणार आहे.नरेंद्र मोदींच्या या पुणे दौऱ्याला महाविकास आघाडीसह डाव्या विचारसरणीच्या व आंबेडकर चळवळीतील विविध पक्ष संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. येथील टिळक पुतळ्याजवळ सकाळी नऊ वाजता आंदोलन करून निषेध केला जाणार आहे.

त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या पुणे दौऱ्याबाबत राष्ट्रवादीची नेमकी भूमिका काय याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.मणिपूर हिंसाचार थांबला नसता नाही पंतप्रधान पुण्यात पुरस्कार घेण्यासाठी येत आहेत. याचाच निषेध करण्यासाठी विरोधी पक्षांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

निषेध म्हणून काळे कपडे परिधान करणार आहोत आणि लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याजवळ भजने गाऊन त्यांना समृद्धी देण्याची मागणी करणार आहोत असे आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

Related posts

चिंता करू नका, ग्राहकांना भुर्दंड नाही; UPI पेमेंटशी निगडीत ‘या’ गोष्टी समजून घ्या

Admin

आगामी निवडणुकांची समीकरणे बदलणार -एकनाथ पवार शिवबंधन बांधणार.

pcnews24

G-20 परिषदेच्या थेट प्रक्षेपणाची जबाबदारी प्रमोद दाभोळे या मराठमोळ्या युवकावर; भारतानं टाकला विश्वास! मीडिया कोऑर्डिनेटर म्हणून निवड

pcnews24

ईद ए मिलाद निमित्त शुक्रवारी सुट्टी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा निर्णय,सलग पाच दिवस शासकीय कामकाज बंद

pcnews24

काँग्रेस मध्ये शिवकुमार व सिध्दारमैय्या समर्थकांची घोषणाबाजी, मुख्यमंत्री पदावरून दावेदारी !

pcnews24

महाराष्ट्र:काँग्रेस आणि ठाकरे शरद पवारांशिवाय ‘पॉवर’ दाखवणार का?प्लॅन ‘बी’ ठरला?

pcnews24

Leave a Comment