March 1, 2024
PC News24
महानगरपालिका

महापालिकेच्या वतीने विचार प्रबोधन पर्वाचे १ ऑगस्ट ते ५ऑगस्ट आयोजन -साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती.

महापालिकेच्या वतीने विचार प्रबोधन पर्वाचे १ ऑगस्ट ते ५ऑगस्ट आयोजन -साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती.

पिंपरी,दि.३०जुलै : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या जयंती निमित्त त्यांच्या विचार व कार्याचा प्रचार, प्रसार करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने पाच दिवसीय कार्यक्रमांचे आणि पर्यावरणपूरक शहरासाठी ५०० झाडांचे वृक्षारोपणाचे आयोजन करण्यात आले आहे.आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी नागरिकांना विचार प्रबोधन पर्वात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

दि.१ऑगस्ट ते ५ ऑगस्ट २०२३ या दरम्यान निगडी येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याजवळच्या बसस्थानका शेजारील प्रांगणात पाच दिवसीय विचार प्रबोधन पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये विविध प्रबोधनात्मक कार्यक्रम, वृक्षारोपण, परिसंवाद, किर्तन, वाद्यांची जुगलबंदी, कविसंमेलन तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची कार्यक्रमास विशेष उपस्थिती असणार आहे. तसेच आयुक्त शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमासाठी खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे, सुप्रिया सुळे, डॉ. अमोल कोल्हे, आमदार उमा खापरे, अण्णा बनसोडे, महेश लांडगे, अश्विनी लक्ष्मण जगताप, संग्राम थोपटे, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप यांची प्रमुख उपस्थिती आहे.

१ ऑगस्ट २०२३ रोजी महापालिकेच्या मुख्य प्रशासकीय भवनातील प्रतिमेस सकाळी १०.३०वाजता आणि त्यानंतर सकाळी ११:०० वाजता निगडी येथील अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्यास आयुक्त सिंह यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात येणार आहे.विचार प्रबोधन पर्वाची सुरुवात पारंपरिक सनई वादनाने होणार आहे.पाच दिवसांच्या प्रबोधन पर्वात प्रबोधनपर गीते,लोकगीते,विशेष मुलाखत व्यसनमुक्तीवर मार्गदर्शनपर व्याख्यान,पारंपरिक वाद्यवादन,

परिसंवाद असे विविध कार्यक्रम सादर होणार आहेत.महापालिकेच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती दिली जाणार असून रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विचार प्रबोधन पर्व निमित्त ५०० झाडांचे वृक्षारोपण करण्यात असल्याची माहिती महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांनी दिली. लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष अण्णासाहेब कसबे, सचिव नितीन घोलप, कार्याध्यक्ष सचिन दुबळे तसेच माजी अध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे या कार्यक्रमास सहकार्य असणार आहे.

महिलांसाठी खेळ पैठणीचा ह्या कार्यक्रमाबरोबरच त्यांच्या निरोगी आरोग्यासाठी स्त्री-रोग तज्ञाचे मार्गदर्शन लाभणार आहे. महिला सक्षमीकरणासाठी समाज विकास विभाग तसेच लाईट हाऊस च्या सहकार्याने महिलांना उद्योजकता प्रशिक्षण व रोजगारासाठी मार्गदर्शन, विद्यार्थ्यांना उच्च तसेच परदेशी शिक्षणाच्या संधी, दिव्यांगांसाठी कल्याणकारी योजना अशा विविध योजनांवर कार्यक्रमात मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती आयुक्त शेखर सिंह यांनी दिली.

Related posts

महानगरपालिका : वैद्यकीय विभागात लिपिकाकडून16 लाखांचा अपहार, तर त्याच्यावर निलंबनाची कारवाई

pcnews24

पिंपरी चिंचवड महानगरपालिका थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करणार, तर 100 जप्त मालमत्तांचा होणार लिलाव

pcnews24

पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पोलीस आयुक्तालय यांची संयुक्त गणेशोत्सव बैठक संपन्न.

pcnews24

मोशी येथील कचरा डेपो व विविध प्रकल्पांची अतिरिक्त आयुक्त यांच्याकडून पाहणी.

pcnews24

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सेमी इंग्रजी शाळांना पालकांची पसंती

pcnews24

‘खासदारांना अशी वागणूक तर सर्वसामान्यांचे काय?’ सुप्रिया सुळे.

pcnews24

Leave a Comment