February 24, 2024
PC News24
जिल्हा

पुणे:मोदींच्या दौऱ्यामुळे महत्त्वाचे मार्ग बंद;टिळक पुरस्कार;विकास कार्यक्रमाचे उद्घाटन.

पुणे:मोदींच्या दौऱ्यामुळे महत्त्वाचे मार्ग बंद;टिळक पुरस्कार;विकास कार्यक्रमाचे उद्घाटन.

लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने पंतप्रधान नरेंद्र मोदींना सन्मानित करण्यात येणार आहे. मोदी उद्या पुण्यात येणार असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने मोठा बंदोबस्त करण्यात आला आहे. अनेक विकासकामांचंही मोदींच्या हस्ते उद्या उद्धाटन होणार आहे.

पुण्यातील मध्यवर्ती भागातच मोदींच्या हस्ते कार्यक्रमांचं उद्घाटन होणार आहे. शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर शासकीय कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान मोदी येत असल्याने सुरक्षेच्या कारणास्तव पुण्यातील वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत. सकाळी सहा वाजल्यापासून ते दुपारी तीनपर्यंत पुण्यातील काही रस्ते बंद असणार आहेत. त्यामुळे लोकांना इतर पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं सांगण्यात आलं आहे.

मोदी पुण्यात आल्यानंतर त्यांच्या वाहनांचा ताफा विद्यापीठ रस्ता, शिवाजी रस्ता, टिळक रस्ता, नामदार गोपाळ कृष्ण गोखले रस्ता या मार्गाने जाणार आहे. पुणे विद्यापीठ चौक, भाऊसाहेब खुडे चौक अर्थात सिमला ऑफिस चौक, गाडगीळ पुतळा चौक, बुधवार चौक, संगमवाडी रोड, सादलबाबा चौक, संचेती चौक, फर्ग्युसन कॉलेज रोड, विमानतळ रोड, सेवासदन चौक, अलका चौक, स. गो. बर्वे चौक, टिळक रोड, गोल्फ क्लब चौक, जेधे चौक असे मार्ग दुपारी तीनपर्यंत बंद असणार आहेत. चालकांनी या मार्गाचा वापर न करता इतर पर्यायी मार्गाने प्रवास करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

मोदींच्या दौऱ्यासाठी सिंहगड रस्त्यावरील कामं थांबण्यात आली आहेत. स्वारगेट येथील नटराज बस स्थानकाचा रस्ता बंद असणार आहे. त्यामुळे इथून जाणाऱ्या बस पर्वती पायथा, खंडोबा मंदिर येथून सुटणार आहेत. सासरबागेकडे जाणारा जेथे चोकातील रस्ता बंद करण्यात आला आहे.

Related posts

आर्यन्स मार्शल आर्ट्स संघाला विजेतेपद !!

pcnews24

शहरात मृत झालेल्या जनावरांचे पुणे महापालिकेच्या नायडू पॉण्ड येथे दफन होणार

pcnews24

Apple ने iOS 16.4 अपडेट केलं रिलीज, मिळणार हे जबरदस्त फीचर्स

Admin

शालेय मुलांना सुट्टी साठी PMPML ची मोठी परवणी.काय आहे खास जाणून घ्या.

pcnews24

पुणे:पोलीस अधीक्षक तुषार दोषींची बदली !!

pcnews24

महानगरपालिका करण्यास उशीर केल्यास चाकण शहर होईल बकाल – राजेश अग्रवाल

pcnews24

Leave a Comment