February 24, 2024
PC News24
गुन्हा

पिंपरी चिंचवडमधे एकतर्फी प्रेमातून घरामधे घुसून तरुणीवर ब्लेडने वार.

पिंपरी चिंचवडमधे एकतर्फी प्रेमातून घरामधे घुसून तरुणीवर ब्लेडने वार.

पिंपरी चिंचवड परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एकतर्फी प्रेमातून एका तरुणाने तो राहत असलेल्या परिसरातील तरुणीवर ब्लेडने वार केले आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून संबधित तरुणावर चिंचवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाना जालिंदर गायकवाड (वय ३०) असं हल्लेखोर तरुणाचं नाव आहे. या प्रकरणात पीडित तरुणीने चिंचवड पोलिसात तक्रार दाखल केली आहे. चिंचवड येथील आनंदनगर येथे हा प्रकार घडला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, संबधित तरुणी आणि हल्लेखोर तरुण हे दोघे चिंचवड परिसरातील आनंदनगर येथे राहतात. गायकवाड याचे सदर तरुणीवर अनेक दिवसांपासून एकतर्फी प्रेम आहे. एक दिवस कामावर जात असताना नाना गायकवाड याने या तरुणीला रस्त्यात अडवले आणि तिच्याकडून तिचा मोबाइल नंबर मागितला,मात्र तरुणीने त्याला मोबाइल नंबर दिला नाही. या गोष्टीचा राग मनात धरून गायकवाड याने तिच्या घरात घुसून ब्लेडने वार केले आणि तिचा विनयभंग केला.या घटनेनंतर पीडित तरुणीने चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत नाना गायकवाड या तरुणाविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखत आरोपी तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.

Related posts

‘Life story’ दर्शना पवारचा व्हिडिओ व्हायरल.

pcnews24

तडीपार गुंडावर गुन्हा तर तिघांना अटक, पिस्टल व जिवंत काढतुस प्रकरणी रावेत येथे कारवाई

pcnews24

मावळ:किशोर आवारे खून प्रकरणातील मुख्य सूत्रधार भानू खळदेला अखेर नाशिकमधून बेड्या ठोकल्या..

pcnews24

पिंपरी चिंचवड : मोशी येथील अनधिकृत पत्राशेडवर कारवाई.

pcnews24

वारजे येथे रस्त्याच्या कडेला सापडली दोन दिवसांची बेबी गर्ल

pcnews24

खेड:स्पा सेंटरच्या नावाखाली होतोय वेश्याव्यवसाय; एका व्यक्तीसह महिलेला अटक.

pcnews24

Leave a Comment