February 24, 2024
PC News24
अपघात

ठाणे:समृद्धी महामार्गावर गर्डर कोसळल्याची भीषण दुर्घटना..बचाव कार्य सुरू.

समृद्धी महामार्गावर गर्डर कोसळल्याची भीषण दुर्घटना..बचाव कार्य सुरू

ठाणे शहरातील शहापूर तालुक्यात समृद्धी महामार्गाचं काम सुरु असताना एक भीषण दुर्घटना घडली आहे. क्रेन पडल्याने त्याखाली दबून तब्बल १४ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे. अपघाताच्या ठिकाणी बचाव कार्य सुरू असून,या घटनेत ३ व्यक्ती जखमी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असली तरी मृतांची संख्या वाढण्याची भीती वर्तवण्यात आली आहे. दरम्यान, या भीषण दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत.

दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांची नावे

१. अरविंद कुमार उपाध्याय (वय ३३, रा.उत्तरप्रदेश)

२. गणेश रॉय (वय ४३, रा. वेस्ट बंगाल)

३. ललन राजभर (वय ३८, रा. उत्तरप्रदेश)

४. परमेश्वर सहानी (वय २५, रा. उत्तरप्रदेश)

५. प्रदीप रॉय (वय ४५, रा. वेस्ट बंगाल)

६. राजेश शर्मा (वय ३२, रा. उत्तराखंड)

७. संतोष जैन – प्रमुख (वय ३५, रा. तामिळनाडू)

८. राधेश्याम यादव (वय ४०, रा. उत्तरप्रदेश)

९. आनंद यादव (वय २५, रा. उत्तरप्रदेश)

१०. पप्पु कुमार (वय ३०, रा. बिहार)

११. कनन (वय ४०, रा. तामिळनाडू)

१२. सुब्रन सरकार (वय २३, रा. वेस्ट बंगाल)मध्यरात्रीच्या सुमारास ही भीषण दुर्घटना घडली आहे.प्रादेशिक आपत्ती व्यवस्थापन कक्षाला मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्ष यांनी दिलेल्या माहितीनुसार रात्री 11ते12 च्या दरम्यान, सातगाव पुल, सरळ आंबेगाव, शहापूर, ठाणे. या ठिकाणी समृद्धी महामार्गावरील ब्रीजचे काम सुरू असताना महामार्गावरील क्रेन तेथील काम करणाऱ्या कामगारांच्या अंगावर पडून अपघात झाला आहे. घटनास्थळी स्थानिक कामगार, पोलीस कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान उपस्थित असून बचाव कार्य युद्धपातळीवरती सुरू आहे.

घटनास्थळी काम करत असलेल्या कामगारांच्या अंगावर क्रेन पडल्यामुळे काही कामगार क्रेन खाली अडकले आहेत.या अपघातात १४ व्यक्तींचा मृत्यू झाला असून,३ व्यक्ती जखमी असून जखमींना जवळील रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले आहे. ही प्राथमिक माहिती महसूल सहाय्यक, शहापूर यांच्याकडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार देण्यात आली आहे.

Related posts

रायगड जिल्ह्यात भूस्खलनाने दरड कोसळल्याची घटना, मुख्यमंत्री घटना स्थळी दाखल.

pcnews24

पुण्याहून पिंपळगाव बसवंतकडे जाणाऱ्या एस.टी बसमधील भोसरी येथील प्रवाशाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू

pcnews24

कासारवाडी जलतरण तलावात क्लोरीन गॅस लिकेज – उपचारासाठी 22 जणांना वायसीएम रुग्णालयात दाखल

pcnews24

अफगाणिस्तानमध्ये भूकंपामुळे हा:हा:कार 320 लोकांचा मृत्यू, अनेक जखमी

pcnews24

बेपत्ता असणाऱ्यांना मृत घोषित करणार!!

pcnews24

पुण्यात शिवशाही बसचा अपघात

pcnews24

Leave a Comment