February 24, 2024
PC News24
गुन्हा

पिंपरी-चिंचवड : पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे ‘ॲक्शन मोड’मध्ये;२४ टोळ्यांवर ‘मोक्का’

पिंपरी-चिंचवड : पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे ‘ॲक्शन मोड’मध्ये;२४ टोळ्यांवर ‘मोक्का’.

पिंपरी-चिंचवड शहरातील गुन्हेगारी समूळ नष्ट करण्यासाठी पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे ‘ॲक्शन मोड’मध्ये आले आहेत.गेल्या सहा महिन्यांत पोलिस आय़ुक्त चौबे यांनी शहरातील सुमारे २४ गुन्हेगारी टोळ्यांवर ‘मकोका’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) लावून जवळपास २२६ गुन्हेगारांवर कारवाई केली आहे. पोलिसांनी घेतलेल्या या कडक भूमिकेमुळे गुन्हेगारांची तंतरली आहे. अनेक गुन्हेगार ‘अंडरग्राउंड’ गेले आहेत.

शहरांमध्ये अनेक तरुणांनी आपली स्वतःची अशी गुन्हेगारी टोळी तयार केली आहे. हे तरुण टोळी पद्धतीने अनेक लहान-मोठे गुन्हे करताना आढळले आहेत. पोलिसांनी यातील अनेकांना अटक करून कारवाई केली होती. मात्र, या टोळ्यांच्या गुन्हेगारी कारवाया थांबल्या नव्हत्या. त्यामुळे शहरातील सर्व गुन्हेगारी टोळ्या समूळ नष्ट करण्यासाठी पोलिस आयुक्तांनी कडक पावले उचलली आहेत.

कारवाया झालेल्या टोळ्या : शुभम ऊर्फ कान्हा सुरेश म्हस्के व १७ साथीदार, दत्ता बाबू सर्यवंशी व तीन साथीदार, हेमबहादूर टेकबहादूर हमाल ऊर्फ हिरा ऊर्फ सुमन व साथ साथीदार, अनिल तुकाराम मोहिते व ११ साथीदार, आकाश ऊर्फ कपाळ्या राजू काळे व सहा साथीदार, विशाल विष्णू लष्करे व ३० साथीदार, कुणाल ऊर्फ बाबा धीरज ठाकूर व २९ साथीदार, राहुल पंडित ऊर्फ राहुल भय्या, राहील महंमद कुरेशी व ११ साथीदार, शाहरुख य़ुनुस खान व ४ साथीदार, अविनाश बाळासाहेब गोठे व चार साथीदार, अतुल ऊर्फ चांड्या अविनाश पवार व दोन साथीदार, अनिल जगन जाधव व सहा साथीदार, बाबा सैफन शेख व आठ साथीदार, जय ऊर्फ कीटक प्रवीण भालेराव व पाच साथीदार, रामा परशुराम पाटील व दोन साथीदार, प्रमोद सोपान सांडभोर व सहा साथीदार, करण रतन रोकडे व १२ साथीदार, आकाश वजीर राठोड व तीन साथीदार, अमोल ऊर्फ धनज्या गजानन गोरगले व तीन साथीदार, अमर ऊर्फ रिंकू कुलवंतसिंग चौहाण व चार साथीदार, यशवंत ऊर्फ अतुल सुभाष डोंगरे व सात साथीदार, सुधीर अनिल परदेशी व पाच साथीदार, सौरभ संतुराम मोतीरावे व तीन साथीदार.

Related posts

येरवडा कारागृहात पुन्हा मोबाईल सापडला,काय प्रकार आहे वाचा.

pcnews24

26/11 हल्ल्यातील आरोपी भारतात आणणार.

pcnews24

मुलीला मारहाण करीत असताना वडिलांनी मध्यस्थी केल्यामुळे त्यांना जावयाकडून मारहाण

pcnews24

पिंपरी चिंचवड पोलिसांचे सलग दोन दिवस ‘ऑल आऊट ऑपरेशन’

pcnews24

गणेशोत्सव व ईदच्या पार्श्‍वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिस अलर्ट मोडवर

pcnews24

जम्मू-काश्मीरमध्ये 2 दहशतवाद्यांचा खात्मा

pcnews24

Leave a Comment