February 24, 2024
PC News24
कला

चिंचवड:स्वरसुधा संगीत विद्यालयाचा “समर्पण” हा गुरूपौर्णिमा विशेष सुरेल कार्यक्रम.

स्वरसुधा संगीत विद्यालयाचा “समर्पण” हा गुरूपौर्णिमा विशेष सुरेल कार्यक्रम

(दि.३०) स्वरसुधा संगीत विद्यालयाचा गुरूपौर्णिमा – “समर्पण” कार्यक्रम पार पडला.कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजन आणि दीप प्रज्वलनाने करण्यात आली.

या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात शास्त्रीय संगीतातील राग भूप ताल तीनताल मधील ‘गाइये गणपती’ ही गणेश वंदना सादर करण्यात आली. त्यानंतर बालगटातील विद्यार्थ्यांनी एकताल मधील सरगम गीत आणि बालगीत सादर केले. शास्त्रीय संगीताचा वसा पुढे नेत राग यमन व तराना निधी, श्रेया, रुजुला तर राग दुर्गा – झपताल मधील बंदिश उर्वी आणि केशवी, राग देस – बंदिश सृष्टी धर्माधिकारी , गुरु वंदना – आदित्य, महिला गटातील नीलिमा ताई , अर्चना ताई, गायत्री ताई या शिष्य परिवाराने गाऊन रसिकांची दाद मिळवली. दुसऱ्या सत्रात सौ. सुधा ताईंनी राग मिया मल्हार सादर करून कार्यक्रमाचा दुसर्‍या भागात शिष्य वर्ग अभंगवाणी सादर करण्यात आली.  सांगीतिक सांगता शिष्य परिवारासोबत प्रार्थना ‘स्वप्नात आले माझ्या गुरुदेव दत्त ‘ या रचनेनी करण्यात आली. त्यानंतर श्रीभगवद्गीता पुस्तिका लच्याण आजी यांनी भेट दिली.सर्व शिष्यांना कार्यक्रम स्थळावर सौ.नीलिमा ताई कांबळे यांनी छान रांगोळी काढली.कार्यक्रमाचे सूत्र संचलान कु. खुशी लच्याण यांनी अतिशय प्रभावीपणे केले.

या संपूर्ण कार्यक्रमामध्ये श्री पियुष कुलकर्णी यांनी दिलेली संवादिनी (पेटी) साथ ,श्री विष्णू गलांडे यांची तबला साथ व श्री मकरंद बादरायणी यांनी दिलेली टाळ साथ ही अमूल्य होती. त्यांच्या या साथीमुळे सर्वच गाणी अधिकच बहरली व सर्व श्रोते गाणी ऐकताना मंत्रमुग्ध झाले.कार्यक्रमाचे छायाचित्रण श्री. विश्वास त्रिकुटकर यांनी केले तर कार्यक्रमाची सांगता करताना पालक प्रतिनिधी सौ. दीप्ती बांडे यांनी आभार मानले.

या स्वरसुधा संगीत विद्यालयाच्या संचालिका सौ.सुधा लच्याण गेली १२ वर्षापासून किराणा घराण्याचे जेष्ठ आणि प्रख्यात गायक गायिका आहेत.

Related posts

द केरळ स्टोरी’ 200 कोटीच्या क्लबमध्ये

pcnews24

प्रबोधनपर लोकगीतांनी होणार लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंतीची सांगता

pcnews24

M PLUS CINE is ready to go on the floor for a shoot with their two new songs with Gautam Gulati, Akshita Mudgal & Karanvir Bohra.

Admin

९७अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विख्यात कादंबरीकार मा. डॉ रविंद्र शोभणे यांची निवड

pcnews24

‘पश्चिम बंगाल सरकारविरोधात कायदेशीर लढा देऊ’.

pcnews24

‘खासदारांना अशी वागणूक तर सर्वसामान्यांचे काय?’ सुप्रिया सुळे.

pcnews24

Leave a Comment