February 24, 2024
PC News24
वाहतूक

पुणेकरांसाठी घर ते मेट्रो स्टेशन शेअर रिक्षाचा पर्याय उपलब्ध होणार; RTO कडून पुढाकार.

पुणेकरांसाठी घर ते मेट्रो स्टेशन शेअर रिक्षाचा पर्याय उपलब्ध होणार; RTO कडून पुढाकार

घरापासून मेट्रो स्थानकापर्यंत शेअर रिक्षाच्या रूपाने सार्वजनिक वाहतुकीचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी आरटीओकडून पावले उचलण्यात येत आहेत.मेट्रो सेवेचा अधिकाधिक प्रवाशांनी वापर करावा, यासाठी परिवहन विभागाकडून पावले उचलण्यात येत आहेत. शहरातील मेट्रो स्थानकांपासून शेअर रिक्षा सुरू करण्यासाठी मार्गांची पाहणी करून त्याची माहिती गोळा करण्याचे काम प्रादेशिक परिवहन विभागाकडून केले जाणार आहे. त्यांच्या अहवालानंतर शेअर रिक्षाचे भाडे निश्चित करून, ती सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.

वनाझ ते रूबी हॉल क्लिनिक आणि पिंपरी-चिंचवड ते सिव्हिल कोर्ट या दोन मार्गांवर ‘महामेट्रो’कडून एक ऑगस्टच्या सायंकाळपासून सेवा सुरू केली जाणार आहे.मेट्रोच्या दाव्यानुसार दररोज एक लाख प्रवासी प्रवास करण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोईच्या दृष्टीने प्रत्येक मेट्रो स्थानकापासून शेअर रिक्षा सेवा सुरू करण्याच्या हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.मेट्रो स्थानकापासून प्रवासी जाण्याचे नेमके कोणते मार्ग आहेत, त्या मार्गांवर प्रवासी भाडे किती, या गोष्टींची माहिती ‘आरटीओ’चे अधिकारी घेणार आहेत. त्यानंतर त्यांचा अहवाल परिवहन विभाग व प्रादेशिक परिवहन प्राधिकरणाला (आरटीए) सादर केला जाणार आहे. त्यानुसार ‘आरटीए’कडून त्या मार्गाचे शेअर रिक्षाचे भाडे ठरवले जाणार आहे. शेअर रिक्षा सुरू झाल्यास त्याचा प्रवाशांना निश्चित फायदा होणार आहे.

प्रवाशांच्या सोईसाठी मेट्रो स्टेशनजवळून शेअर रिक्षा सुरू करण्यासाठी वाहतूक पोलिस, मेट्रोचे प्रतिनिधी, रिक्षा संघटनांचे प्रतिनिधी, ग्राहक संघटना, पुणे महापालिकेचे प्रतिनिधी यांना सहभागी करून घेतले जाणार आहे. त्यासाठी या सर्वांची लवकरच बैठक आयोजित केली जाणार आहे. या सर्वांच्या सहभागातून शेअर रिक्षा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

Related posts

भरावा लागेल 25 हजारांचा दंड!!अल्पवयीन मुलांच्या हाती गाडी देताना विचार करावा.

pcnews24

‘ ट्रॅफिक वार्डनची वाढती अरेरावी थांबवा.’.. माजीनगरसेवक संदीप वाघेरे यांची आग्रही मागणी

pcnews24

वाहन चालकाकडून पैसे घेतल्याने 2 पोलीस निलंबित (व्हिडिओ सह)

pcnews24

पुणे जिल्हा:ट्राफिक पोलिसांकडे येणार अद्यावत कॅमेरे, वाहतूक नियम तोडणाऱ्यावर राहणार बारीक लक्ष, पुण्यात आता फोटोवरून कारवाई

pcnews24

‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’ची निर्मिती-वाकड,भूमकर चौक, पुनावळे, देहूरोडमधील वाहतूक कोंडीवर उपाय

pcnews24

महाराष्ट्र:पुणे होणार ‘EV’ हब! राज्यातील इतर जिल्ह्यातही होणार मोठी गुंतवणूक

pcnews24

Leave a Comment