February 24, 2024
PC News24
वाहतूक

पुणे मेट्रो,वेस्ट टू एनर्जी प्रकल्प,यासह विविध विकास कामांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण.

पुणे मेट्रो,वेस्ट टू एनर्जी प्रकल्प,यासह विविध विकास कामांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वेस्ट टू एनर्जी प्रकल्प, पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत उभारलेल्या सुमारे चार हजार घरांचे लोकार्पण अशा विविध कामांचे आणि पीएमआरडीए कडून भविष्यात साडेसह हजार पेक्षा अधिक बांधल्या जाणाऱ्या घरांची पायाभरणी मोदी यांच्या हस्ते झाली.

पंतप्रधान मोदी यांनी मेट्रो रेल्वेला हिरवा झेंडा दाखवून पुणे मेट्रो टप्पा 1 च्या पूर्ण झालेल्या दोन मार्गिकांच्या सेवेचे लोकार्पण केले. हे विभाग फुगेवाडी ते दिवाणी न्यायालय स्थानक तसेच गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल क्लिनिक स्थानकापर्यंत आहेत. 2016 मध्येही पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाची पायाभरणी झाली होती. मेट्रो रेल्वेचे हे नवीन विभाग पुणे शहरातील शिवाजी नगर, दिवाणी न्यायालय, पुणे महानगरपालिका कार्यालय, पुणे आरटीओ आणि पुणे रेल्वे स्थानक यांना जोडले जाणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज यांच्यापासून प्रेरणा घेत मेट्रो रेल्वे मार्गावरील काही मेट्रो स्थानकांची रचना करण्यात आली आहे. छत्रपती संभाजी उद्यान मेट्रो स्थानक आणि डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकांची रचना ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी परिधान केलेल्या पगडी सारखी म्हणजेच ज्याला “मावळा पगडी” देखील म्हटले जाते, या सारखी आहे. शिवाजी नगर भूमिगत मेट्रो स्थानकाची एक विशिष्ट रचना आहे जी छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेल्या किल्ल्यांची आठवण करून देते.

आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे दिवाणी न्यायालय मेट्रो स्थानक हे देशातील सर्वात खोलवर असलेल्या मेट्रो स्थानकांपैकी पैकी एक आहे, ज्याचा सर्वात खोल बिंदू 33.1 मीटर आहे. सूर्यप्रकाश थेट फलाटावर पडेल अशा पद्धतीने या स्थानकाचे छत बनवण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका अंतर्गत कचऱ्यापासून ऊर्जा निर्माण करणाऱ्या (वेस्ट टू एनर्जी) संयंत्राचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. सुमारे 300 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात आलेल्या या संयंत्राच्या माध्यमातून दरवर्षी सुमारे 2.5 लाख मेट्रिक टन कचरा वापरून वीज निर्मिती केली जाणार आहे.

सर्वांसाठी घरे या उद्दिष्टपूर्तीच्या ध्येयाकडे वाटचाल करत, प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिके कडून बांधण्यात आलेली 1280 हून अधिक घरे पंतप्रधानांच्या हस्ते हस्तांतरीत करण्यात आली. पुणे महापालिकेने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत बांधलेली 2650 हून अधिक घरे देखील पंतप्रधान हस्तांतरित केली. त्यांनतर प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेद्वारे बांधण्यात येणार्‍या सुमारे 1190 घरांची आणि पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून बांधण्यात येणाऱ्या 6400 हून अधिक घरांची पायाभरणी मोदी यांनी केली.

Related posts

मोरवाडी चौकातील सिग्नलची निर्धारित वेळ वाढविण्याची मागणी.

pcnews24

चांदणी चौक:केंद्रीय मंत्री गडकरींच्या हस्ते चांदणी चौक नव्या पुलाचे लोकार्पण.

pcnews24

पुणे जिल्हा:ट्राफिक पोलिसांकडे येणार अद्यावत कॅमेरे, वाहतूक नियम तोडणाऱ्यावर राहणार बारीक लक्ष, पुण्यात आता फोटोवरून कारवाई

pcnews24

राष्ट्रीय:इंडिगोचे विमान खराब हवामानामुळे पाकिस्तानच्या हवाई हद्दीत

pcnews24

मध्य रेल्वेत मेगा भरती.

pcnews24

पुणे मेट्रोची स्टिअरिंग सावित्रीच्या लेकींच्या हाती;…नऊ महिलांची लोको पायलटपदी वर्णी.

pcnews24

Leave a Comment