February 24, 2024
PC News24
गुन्हा

पिंपरी चिंचवड:तरुणींच्या छेडछाडीबाबत पोलिस तात्काळ कारवाई करणार”- विनयकुमार चौबे- पोलिस आयुक्त.

पिंपरी चिंचवड:तरुणींच्या छेडछाडीबाबत पोलिस तात्काळ कारवाई करणार”- विनयकुमार चौबे- पोलिस आयुक्त.

पिंपरी- चिंचवडमध्ये कॉलेज परिसरात फिरणाऱ्या रोडरोमीओंची धरपकड करण्यात आली असून पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

पिंपरी- चिंचवड शहरातील कॉलेज आणि शाळा परिसरात फिरणाऱ्या रोडरोमीओंवर गुंडाविरोधी पथक आणि गुन्हे शाखा युनिट एक ने ही कारवाई केली आहे. यावेळी२७ अल्पवयीन रोडरोमिओं ला समज देऊन त्यांच्यावर कारवाई करण्यात आली अशी माहिती गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक हरीश माने यांनी दिली आहे. आहे.

कॉलेज विद्यार्थिनींची छेडछाड अशी प्रकरणे खपवून घेतली जाणार नाहीत. त्यांच्यावर तात्काळ कारवाई केली जाईल असे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी सांगितले. साध्या वेशातील पोलिसांनी ही कारवाई केली असून या रोडरोमिओंना त्यांनी चांगला धडा शिकवला आहे.

पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातील शाळा आणि कॉलेज परिसरात विद्यार्थिनींच्या सुरक्षतेविषयी आढावा घेण्यासाठी आज गुंडा विरोधी पथक आणि गुन्हे शाखा युनिट एक चे पोलिस अधिकारी आणि कर्मचारी साध्या वेशात फिरत होते. तेव्हा, राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ भोसरी, बालाजी लॉ कॉलेज ताथवडे, एम.एम कॉलेज काळेवाडी, राजमाता जिजाऊ कॉलेज डुडुळगाव, निर्मल बेथनी कॉलेज काळेवाडी, फत्तेचंद जैन कॉलेज चिंचवड, या शाळा आणि कॉलेज परिसरात फिरणाऱ्या २७ रोडरोमिओंवर शांतता भंग केल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे. छेडछाड प्रकरणी किंवा इतर काही गैरप्रकार झाल्यास कॉलेजमधील तक्रार पेटीचा वापर करावा असे आवाहन पोलिसांकडून विद्यार्थी आणि तरुणींना करण्यात आल आहे. या अगोदर अंमली पदार्थ विरोधी पथकाने शहरातील शाळा आणि कॉलेज परिसरातील शंभरहून अधिक पान टपऱ्यांवर महानगर पालिकेच्या सहकार्याने अतिक्रमणाची कारवाई केली होती. यापुढे अशा तक्रारी आल्यास त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.

“कॉलेज आणि शाळेतील विद्यार्थीनीची छेड काढल्यास त्या तरुणीने किंवा तिच्या मैत्रिणीने पोलिसांशी संपर्क साधावा. त्या ठिकाणी तात्काळ पोलिस पाठवले जातील. विद्यार्थीनीची छेडछाडीचे प्रकार अजिबात सहन केले जाणार नाहीत. तशी तक्रार असल्यास दामिनी पथक,किंवा गस्तीवर असलेल्या पोलिसांशी संवाद साधावा. तात्काळ मदत हवी असल्यास ११२ या नंबरवर फोन करावा.

Related posts

दिघी :महिलेच्या पर्समधून पीएमपी बस प्रवासात 59 हजाराची रोकड लंपास

pcnews24

राज्य परीक्षा परिषदेच्या तत्कालीन आयुक्त शैलजा दराडे यांना अटक;५ कोटींचा अपहार.

pcnews24

दूर्दैवी प्रकार ,मुलानेच बापाला ट्रॅक्टरखाली चिरडले.

pcnews24

दारू पिऊन कुटुंबाला मारहाणकरांना वडिलांचा खूप

pcnews24

तोतया आयएएस अधिकारी तायडे यांस तळेगांव दाभाडे येथे अटक

pcnews24

पिंपळे निलख येथील स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय- दोघांना अटक,अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाची कारवाई.

pcnews24

Leave a Comment