February 24, 2024
PC News24
महानगरपालिका

महानगरपालिका:नागरिकांना पिण्याचे पाणी उकळून,गाळून पिण्याचे आवाहन

महानगरपालिका:नागरिकांना पिण्याचे पाणी उकळून,गाळून पिण्याचे आवाहन.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका,(दि.१)पाणीपुरवठा विभागाकडून नागरिकांसाठी आवाहन करण्यात आले आहे.पिंपरी चिंचवड शहराला मावळातील पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. महापालिका रावेत येथील बंधा-यातून पाणी उचलते व ते पाणी प्राधिकरणातील जलशुध्दीकरण केंद्रातून शुध्द करून शहरातील विविध भागातील टाक्यांमध्ये वितरीत केले जाते.
सद्यस्थितीत पवना धरण परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे पवना नदीत गढूळ पाणी येत आहे.हे पाणी जलशुध्दीकरण केंद्रातून शुध्द करण्यात येत असून पिण्यासाठी पूर्णपणे योग्य आहे. तरीही नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, खबरदारी म्हणून नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून व गाळून घ्यावे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागा कडून हे आवाहन करण्यात आले आहे.

Related posts

महापालिका सभा आणि स्थायी समिती सभेची विविध विषयांना मान्यता-

pcnews24

महापालिका ‘या’ मोक्याच्या जागा देणार पार्कींगसाठी-खासगी संस्थांकडून मागविले प्रस्ताव

pcnews24

महानगरपालिकेच्या वतीने शहरवासीयांसाठी दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी दिवाळी पहाटचे आयोजन…

pcnews24

पिंपरी चिंचवड शहरात पुन्हा एकदा अवैध वृक्षतोड.. कारवाईसही टाळाटाळ?

pcnews24

पिंपरी चिंचवड महानगरपालिका थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करणार, तर 100 जप्त मालमत्तांचा होणार लिलाव

pcnews24

शेगडी, सिलेंडरच्या साठ्यावर पोलिसांचा मोठा छापा,देशी विदेशी गावठी दारुसाठी वापर

pcnews24

Leave a Comment