February 24, 2024
PC News24
अपघात

शिरूर:मद्यधुंद ट्रकचालकाची बाईकला धडक- बाप – लेकाचा जागीच मृत्यू.

शिरूर:मद्यधुंद ट्रकचालकाची बाईकला धडक- बाप – लेकाचा जागीच मृत्यू.

पाबळ – शिरूर रस्त्यावर मद्यधुंद ट्रकचालकाने दुचाकीवरून चाललेल्या दाम्पत्याला धडक दिल्याने बाप – लेकाचा जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे.या अपघातात पत्नी गंभीर जखमी झाली आहे.

भाऊसाहेब काळूराम चौधरी (वय ४३) आणि मुलगा अश्विन भाऊसाहेब चौधरी (वय ८) अशी मृत्यू झालेल्या बाप लेकांची नावे असून अनिता भाऊसाहेब चौधरी गंभीर जखमी झाल्या आहेत. या प्रकरणी ट्रक चालक अमोल सुदाम कदम यांच्यावर शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिरूर तालुक्यातील शिरूर – खैरेनगर – पाबळ रस्त्याने भाऊसाहेब चौधरी हे मंगळवारी रात्रीच्या सुमारास एमएच १२ सिक्यू ८५३७ या दुचाकीहून पत्नी आणि मुलासह जात होते. हॉटेल बैठक समोर पाठीमागून आलेल्या एमएच १२ युएम २३०३ या ट्रकने चौधरी यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या धडकेत वडील भाऊसाहेब आणि मुलगा आश्विन हे रस्त्यावर पडले. या दोघांच्या अंगावरून ट्रकचे चाक गेल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांची पत्नी अनिता ही रस्त्याच्या बाजूला पडल्याने त्या वाचल्या, मात्र त्यांना गंभीर जखमी झाल्या आहेत.

पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. तर जखमीं महिलेला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी ट्रक चालकाची चौकशी केली असता ट्रक चालक दारू पिला असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या घटनेबाबत गणेश शंकर चौधरी यांनी फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पुढील तपास शिक्रापूर पोलिस करत आहेत.

Related posts

नऱ्हे येथील स्वामी नारायण मंदिराजवळ भीषण अपघात -ट्रकची कंटेनरला जोरदार धडक, आगीत चौघांचा होरपळून जागीच मृत्यू

pcnews24

दिल्लीतील एम्स रुग्णालयाला भीषण आग!अग्निशामक दलाच्या सहाहून अधिक गाड्या तातडीने घटनास्थळी रवाना.

pcnews24

जुन्या मुंबई – पुणे हायवेवर खंडाळ्याजवळ पिकअप आणि कंटेनर चा भीषण अपघात, एक ठार दोन जखमी

pcnews24

अमरावती : चार्जिंगला लावलेला मोबाईल काढताना हाय व्होल्टेज विद्युत प्रवाहाने तरुणाचा मृत्यू

pcnews24

लोणावळा : गणेशोत्सवाचे पावित्र्य राखा;कायदा, नियम मोडणाऱ्यांवर गुन्हे दाखल करू : सत्यसाई कार्तिक.

pcnews24

पिंपळे सौदागर:उघड्या डीपीला हात लागून अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी

pcnews24

Leave a Comment