February 24, 2024
PC News24
राज्य

“अरे ये अबू आझमी”…विधानसभा सभागृहात आमदार महेश लांडगेंचा ‘रुद्रावतार’.

“अरे ये अबू आझमी”…विधानसभा सभागृहात आमदार महेश लांडगेंचा ‘रुद्रावतार’

भाजपाचे आमदार महेश लांडगे यांनी आज भर विधानसभा सभागृहात समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली.

शिवप्रतिष्ठा हिंदूस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरुन कारवाई बाबत सभागृहात चर्चा सुरू होती.आमदार लांडगे प्रश्न उपस्थित करीत असताना अबू आझमी यांनी मध्येच ‘‘शिवाजी महाराज की जय’’ अशी घोषणा दिली. यावर संतापलेल्या लांडगे यांनी अरे ये… अबू आझमी… असा उल्लेख करत ‘‘शिवाजी महाराजांना मानतो मग औरंग्याला लळा का लावतो? ’’ असा प्रश्न उपस्थित केला.

छत्रपती शिवाजी महाराज यांना मानतो, मग औरंगजेबाचे उदात्तीकरण कशासाठी करतो…’’ अशा शब्दांत सुनावले.लांडगे यांचा हा रुद्रावतार पाहून सभागृहात शांतता पसरली होती.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मध्यस्थी करत परिस्थिती निवळवण्याचा प्रयत्न केला. छत्रपती संभाजी महाराजांचा ज्या औरंगजेबाने अनन्वित छळ केला हे आम्ही कधीच विसरू शकत नाही.असेही उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Related posts

तुळजाभवानी मंदिर परिसराचं रुप पालटणार,राज्य सरकारचा मोठा निर्णय,मंदिरासाठी१३८५ कोटींचा निधी मंजूर.

pcnews24

खासगी ट्रॅव्हल्स बसला पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात.

pcnews24

थरथरते हात अन् व्हिलचेअरवर बसून केलेल्या शेवटच्या भाषणात गिरीश बापट काय म्हणाले होते?

Admin

महाराष्ट्र:जसा पोपटाचा जीव पिंजऱ्यात असतो तसा आमच्या नेत्याचा जीव मुंबई महानगरपालिकेत, एकनाथ शिंदेंचा उध्दव ठाकरेंवर हल्लाबोल.

pcnews24

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरिक ‘ब्लॅक स्पॉट’च्या ठिकाणांवर तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना.

pcnews24

शरद पवार गटाच्या चिंता वाढल्या,आरोपांचा भडिमार,अजित पवार गटाने निवडणूक आयोगासमोर मांडले हे १० मुद्दे

pcnews24

Leave a Comment