February 24, 2024
PC News24
राज्य

महाराष्ट्र:…फक्त मुद्द्याचं बोलूया!रोहित पवार यांचं ट्विट व्हायरल.

महाराष्ट्र:…फक्त मुद्द्याचं बोलूया!रोहित पवार यांचं ट्विट व्हायरल.

आमदार रोहित पवार यांनी MIDC मधील प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी मित्राने गिफ्ट दिलेले जॅकेट घालून आज विधानसभेत प्रवेश केला.सर्वांचेच लक्ष वेधून घेणाऱ्या या टी-शर्टवरील मजकूर खुद्द उद्योग मंत्री उदय सामंत यांनीही वाचला आहे.त्यावर पवार यांनी ट्विट करत ‘माझे मित्र आणि उद्योगमंत्री उदय सामंत साहेब यांनाही #MIDC कडे लक्ष वेधणारा हा टी-शर्ट #आवडला. पण तरीही त्यांनी हा प्रश्न का #आडवला? तर त्यामागे राजकीय दबाव असल्याचं अप्रत्यक्षरित्या दिसतंय… पण हजारो युवांच्या भवितव्याचा हा विषय असल्याने राजकीय दबाव झुगारून ते #MIDC चा प्रश्न मार्गी लावतील, ही अपेक्षा!असे म्हंटले आहे.

रोहित पवार यांनी त्यांच्या मतदारसंघातील MIDC सह सर्वच युवांसाठी महत्त्वाचा असलेला रोजगाराचा विषय अधिवेशनात लावून धरल्याने मतदारसंघाबाहेरच्या एका मित्राने हा टी-शर्ट त्यांना भेट म्हणून दिला. शिवाय त्यावर मजकूर लिहिला होता की..

‘ध्येय विकासाचं ठेवूया

वेध भविष्याचा घेऊया

युवाशक्तीला संधी देऊया

आणि फक्त मुद्द्याचं बोलूया!

मनातला निश्चियही त्या टी-शर्टवर रेखाटत युवांच्या मुख्य प्रश्नांवरून ढळायचं नाही, हा मेसेज देण्याची त्याची कल्पना आवडल्यानेच हा टी-शर्ट घालूनच विधानभवनात प्रवेश केला.माझ्या मतदारसंघातील #MIDC च्या मागणीचा आवाज थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्यापर्यंत पोचवण्याचा प्रयत्न या युवांनी केला. त्यांचा हा आवाज किमान राज्य सरकार तरी ऐकेल आणि #MIDC ची अधिसूचना काढण्याची कार्यवाही करेल, ही अपेक्षा!रोहित पवार यांनी ट्विटर वरून व्यक्त केली आहे.

Related posts

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची महत्त्वाची भूमिका:मुरलीधर मोहोळ.

pcnews24

सिडको काढणार 5000 घरांची लॉटरी

pcnews24

मुंबई, रत्नागिरीला यलो अलर्ट!!

pcnews24

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारार्थीची यादी जाहीर

pcnews24

सततचा पाऊस नैसर्गिक आपत्ती म्हणून जाहीर!!

pcnews24

राज्यात 22 नवे जिल्हे प्रस्तावित,पहा कोणते नवीन जिल्हे ?

pcnews24

Leave a Comment