February 24, 2024
PC News24
गुन्हा

पुणे:दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवणारा बडोदावाला अटकेत.

पुणे:दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवणारा बडोदावाला अटकेत.

पुणे पोलिसांनी काही दिवसांपूर्वी पकडलेल्या दोन दहशतवाद्यांच्या प्रकरणात आता दररोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. दहशतवाद विरोधी पथक पोलिसांनी या प्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. यातील एकाला ‘आयसिस’ दहशतवादी संघटनेच्या महाराष्ट्र गटाच्या दोघांना एनआयएने पकडले होते. या दोघांचे एकमेकांशी लागेबांधे असल्याचे समोर आल्यानंतर एटीएसने न्यायालयीन कोठडीत असलेल्या झुल्फिकार अली बडोदावाला या दहशवाद्याला मुंबईतील ऑर्थर कारागृहातून मंगळवारी ताब्यात घेतले.

कोथरूड पोलिसांनी दुचाकी चोरी करण्याच्या प्रयत्नात असताना महम्मद इम्रान महम्मद युसूफ खान (वय 23) आणि महम्मद युसूफ महम्मद याकूब साकी (वय 24, दोघेही रा. चेतना गार्डन, मिठानगर, कोंढवा, मूळ रा. रतलाम, मध्य प्रदेश) यांना पकडले होते.

यांच्या चौकशीतून त्यांना आश्रय देणाऱ्या अब्दुल कादीर दस्तगीर पठाण (वय ३२, रा. कोंढवा) याला अटक केली. तिघांकडील चौकशीत या दोघांना अभियंता सिमाब नसरुद्दीन काझी (वय 27, रा. कौसरबाग, कोंढवा, मूळ रा. पंढरी, रत्नागिरी) याला पकडले

अब्दुल पठाण, इम्रान खान, युसूफ साकी, सिमाब काझी यांची एकत्रित चौकशी करण्यात आली. तेव्हा दहशतवादी कारवायात बडोदावाला सामील असल्याचे निष्पन्न झाले.

तो या दहशतवाद्यांना आर्थिक रसद पुरवत असल्याचे उघडकीस आल्या नंतर रत्नागिरीतून त्याला अटक करण्यात आली.बडोदावाला याला एनआयएने महाराष्ट्र दहशतवादी विचारधारेचा प्रसार केल्याप्रकरणी अटक केली होती. मुंबई मध्यवर्ती कारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेल्या बडोदावाला याला एटीएसने मंगळवारी अटक केली.

Related posts

आज संध्याकाळी पिंपरी चिंचवड शहरात गोळीबार.

pcnews24

जास्तीचे पैसे लावण्यावरून जाब विचारला, म्हणून पेट्रोल पंप कर्मचाऱ्यांची ग्राहकाला मारहाण

pcnews24

तळेगाव:लेखक राजन खान यांच्या मुलाची आत्महत्या.

pcnews24

मोरेवस्ती, चिखली: व्यावसायिकाने हप्ता देण्यास नकार दिल्याने दुकानाची तोडफोड

pcnews24

पिंपरी चिंचवड पोलिसांचे सलग दोन दिवस ‘ऑल आऊट ऑपरेशन’

pcnews24

पुणे गुन्हे अन्वेषण विभाग:पाकिस्ताननी गुप्तहेरांच्या संपर्कातील सॉफ्टवेअर इंजिनिअर पोलिसांच्या जाळ्यात

pcnews24

Leave a Comment