February 24, 2024
PC News24
वाहतूक

पुणे मेट्रो दुसऱ्या टप्प्यात ३० हजार नागरिकांचा प्रवास.

पुणे मेट्रो दुसऱ्या टप्प्यात ३० हजार नागरिकांचा प्रवास.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 1) पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे लोकार्पण झाल्यानंतर बुधवारी (दि. 2) मेट्रोतून प्रवास करण्यास नागरिकांनी पसंती दिली. एका दिवसात 30 हजार पेक्षा अधिक नागरिकांनी मेट्रोतून प्रवास केला आहे.

1 ऑगस्ट रोजी फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट आणि गरवारे ते रुबी हॉल क्लिनिक अशी एकूण 11.6 किमी अंतरावरील मेट्रो सुरू करण्यात आली.

एका दिवसात(बुधवारी)पीसीएमसी ते सिव्हील कोर्ट यादरम्यान 10 हजार 826 तर वनाज ते रुबी हॉल क्लिनिक यादरम्यान 19 हजार 494 अशा एकूण 30 हजार 320 नागरिकांनी मेट्रोतून प्रवास केला.पीसीएमसी ते स्वारगेट या मार्गावर 14 स्थानके आहेत. तर वनाझ ते रामवाडी या मार्गावर 16 स्थानके आहेत.

रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी दरम्यानची मेट्रो सप्टेंबर 2023 आणि सिव्हिल कोर्ट ते स्वारगेट दरम्यानची मेट्रो डिसेंबर 2023 मध्ये उर्वरित सुरू करण्याचा मानस आहे.

दुसऱ्या टप्प्यात सुरू करण्यात आलेल्या मार्गामुळे पुणे आणि पिंपरी चिंचवड ही दोन्ही शहरे एकमेकांना मेट्रोने जोडली गेली आहेत. त्यामुळे मेट्रोचा चाकरमानी वापर करतील अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. ही शक्यता मूर्त रूप घेत असल्याचे बुधवारी दिसून आले.

Related posts

‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’ची निर्मिती-वाकड,भूमकर चौक, पुनावळे, देहूरोडमधील वाहतूक कोंडीवर उपाय

pcnews24

‘ ट्रॅफिक वार्डनची वाढती अरेरावी थांबवा.’.. माजीनगरसेवक संदीप वाघेरे यांची आग्रही मागणी

pcnews24

पुणे:पीएमपीएमएल च्या दोन नवीन बस सेवा ; कोणत्या ते वाचा

pcnews24

उप प्रादेशिक परिवहन कार्यालय करणार दुचाकीं साठी नोंदणी क्रमांकाची ‘KY’ ही नवीन मालिका,असा मिळवा आकर्षक नोंदणी क्रमांक

pcnews24

पिंपरी चिंचवड:शहरात होत असलेल्या अवजड वाहतुक मार्गात मोठे बदल

pcnews24

पुण्यात शिवशाही बसचा अपघात

pcnews24

Leave a Comment