February 24, 2024
PC News24
कला

निसर्गकवी ना.धों. महानोर यांचे पुण्यात निधन.

निसर्गकवी ना.धों. महानोर यांचे पुण्यात निधन.

ज्येष्ठ कवी ना. धों. महानोर म्हणजे महाराष्ट्राला पडलेलं निसर्गस्वप्न. इथला निसर्ग जणू त्यांच्याच शब्दांतून बोलतो, डोलतो आणि नाचतोही! त्यांच्या निसर्गकवितांनी आजवर महाराष्ट्राला रानभूल घातली आहे.तरल काव्यासाठी ओळखले जाणारे आणि मातीचा गंध गीतांतून देणारे ज्येष्ठ कवी, गीतकार ना. धों. महानोर यांचं वयाच्या८१ वर्षी निधन झाले गेल्या काही वर्षांपासून किडनीच्या आजाराने ते त्रस्त होते. त्यांच्यावर पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिक येथे उपचार सुरू होते. आज सकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाने साहित्य विश्वावर शोककळा पसरली आहे.

ना. धों. महानोर यांच्या ‘रानातल्या कवितां’ना खरा मातीचा गंध यायचा. त्यांच्या गीतांमधून –
कवितांमधून निसर्गाचं खऱ्या अर्थाने दर्शन घडायचं. त्यांनी जशी निसर्गाची वर्णन करणारी गीतं लिहिली, तशा ठससेबाज लावण्याही लिहिल्या. श्रावणातल्या उन्हाचा कोवळेपणा आणि स्त्रीचा नाजूकपणा एकत्रितपणे दर्शवणारी कवी ना.धों. महानोर यांची ‘श्रावणाचं ऊन्ह मला झेपेना’ ही लावणी लोकप्रिय झाली. आशा भोसले यांनी ‘एक होता विदूषक’ या चित्रपटासाठी गायली आहे.आम्ही ठाकर ठाकर, चिंब पावसानं रान झालं आबादानी, नभ उतरू आलं, जांबुळ पिकल्या झाडाखाली, जाई जुईचा गंध, किती जीवाला राखायचं, बाळगू कशाला व्यर्थ कुणाची भीती अशी एकाहून एक सर गाणी ना.धों. महानोर यांनी लिहिली.महानोर यांनी आपल्या साहित्यात काहीवेळा मराठीच्या बोलीभाषांचा वापर केला आहे. त्यांच्या कवितांनी बालकवी व बहिणाबाईंचा वारसा समृद्ध केला. ना.धों. महानोरांचे ‘पानझड’, ‘तिची कहाणी’, ‘पळसखेडची गाणी’ म्हणजे मराठवाडी लोकगीतांचा खजिना.

पंचेचाळीस वर्षांपूर्वी हजार लोकसंख्या असलेलं पळसखेडे हे गाव महानोरांच्या कवितांमुळे जगाच्या नकाशावर आलं आहे. या गावाची माती आणि शेती त्यांना चिकटली ती कायमची. तिचा त्यांनी कायम अभिमान बाळगला. ते कुठेही गेले तरी पळसखेड हे त्यांचं आनंदनिधान ठरलं आहे. तिथे त्यांनी महात्मा फुले यांच्या नावाने वाचनालय सुरू केलं असून तेथील सामाजिक-सांस्कृतिक चळवळीचं ते प्रमुख केंद्र ठरलं आहे. महानोर यांनी केवळ निसर्गकविता न लिहिता, आपल्या काव्यलेखनाला त्यांनी प्रत्यक्ष कृतीची जोड दिली. त्यातून आपल्या गावी पळसखेड्याला शेतीचे विविध प्रयोगही केले. त्यामुळेच सरकार कुठलंही असो, त्यांचं लक्ष कृषिधोरणाकडेच असायचे.

Related posts

लातूरच्या सृष्टीचा सलग 127 तास डान्स

pcnews24

महाराष्ट्र:मुलाच्या गे रिलेशनशीप विषयी महेश मांजरेकरांनी केलेलं एक वक्तव्य चर्चेत.

pcnews24

ज्येष्ठ अभिनेत्री आशा नाडकर्णी यांचे ८० व्या वर्षी निधन.

pcnews24

M PLUS CINE is ready to go on the floor for a shoot with their two new songs with Gautam Gulati, Akshita Mudgal & Karanvir Bohra.

Admin

नाट्यगृहांची भाडेवाढ करण्यास विरोध नाही. मात्र,ती वाढ अवाजवी असू नये.-भाऊसाहेब भोईर

pcnews24

पुणे:जाणीव कविसंमेलन उत्साहात संपन्न.

pcnews24

Leave a Comment