February 24, 2024
PC News24
वाहतूक

पिंपरी चिंचवड मधून अष्टविनायक यात्रेसाठी एसटीची विशेष सुविधा.

पिंपरी चिंचवड मधून अष्टविनायक यात्रेसाठी एसटीची विशेष सुविधा.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वल्लभनगर आगाराच्या वतीने अष्टविनायक दर्शन बससेवेची सुरुवात करण्यात आली आहे.प्रत्येक संकष्टी चतुर्थीच्या दिवशी वल्लभनगर आगारातून या बस सकाळी अष्टविनायक यात्रेसाठी रवाना होतात. या यात्रेला पिंपरी चिंचवड परिसरातील भाविक चांगला प्रतिसाद देत आहेत.

शुक्रवारी (दि. 4) संकष्टी चतुर्थी असून त्यानिमित्त गणेश भक्तांच्या सोयीसाठी अष्टविनायक दर्शन यात्रा आज गुरुवारी सुरू करण्यात आली. दोन दिवसांच्या या यात्रेसाठी पिंपरी चिंचवड ते अष्टविनायक प्रवासासाठी प्रौढांना एक हजार रुपये तर लहान मुलांसाठी पाचशे रुपये तिकीट दर आकारण्यात आला आहे.अष्टविनायक दर्शन यात्रेत थेऊर, मोरगाव, सिद्धटेक, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री, महाड, पाली असे नियोजन असणार आहे. प्रवासादरम्यान दर्शनासाठी आलेल्या भाविकांसाठी ओझर येथे राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रवाशांना हा खर्च वैयक्तिक करावा लागणार आहे.

पिंपरी चिंचवडमधील वल्लभनगर आगारातून दोन बसची व्यवस्था करण्यात आली आहे. एका बसचे आगाऊ बुकिंग झाले असल्याने दुसऱ्या बसची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांना बस स्थानकावर अथवा www.msrtc.gov.in या संकेतस्थळावर आगाऊ आरक्षण करता येईल.

Related posts

‘पुणे वन कार्ड’ होणार मल्टिपर्पज.

pcnews24

पुणे – लोणावळा – पुणे लोकलच्या चार फेऱ्या रद्द , सोमवार (दि.26) ते बुधवार (दि.29) रेल्वेचा इंजिनिअरिंग ब्लॉक

pcnews24

मेट्रोच्या तिकीट दरात विद्यार्थ्यांसाठी खास ऑफर

pcnews24

मोशी:स्कूलबसमध्ये ९२ विद्यार्थी;मोशीतील ‘एक्सलन्स स्कूल’ मधील धक्कादायक प्रकार.

pcnews24

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री श्री.नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून साकारणार ई महामार्ग.

pcnews24

‘ ट्रॅफिक वार्डनची वाढती अरेरावी थांबवा.’.. माजीनगरसेवक संदीप वाघेरे यांची आग्रही मागणी

pcnews24

Leave a Comment