February 24, 2024
PC News24
ठळक बातम्या

भंगार माफिया विरोधात कारवाई कधी?- सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांचा प्रशासनास सवाल.

भंगार माफिया विरोधात कारवाई कधी?- सामाजिक कार्यकर्ते सचिन काळभोर यांचा प्रशासनास सवाल.

औद्योगिक शहर असलेल्या पिंपरी चिंचवडमधे मोशी, चिखली आणि कुदळदवाडी या उद्योग पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर भंगार माफिया सक्रिय झाले आहेत. कुदळदवाडी, चिखली, मोशी आणि तळवडे भागात किमान ८००ते ९०० मोठे भंगार गोदाम आणि १५००हून अधिक छोटे गोदाम आहेत.या गोदामात तांबे,पितळ,
लोखंडी वस्तू,पुठ्ठे, इलेक्ट्रॉनिक सामान, टायर,रबर,गाड्यांचे स्पेअर पार्ट, प्लास्टिक इत्यादी अनेक वस्तू भंगार माफिया गोळा करून ठेवतात. अनेक ठिकाणी
,बेकायदेशीररित्या हे भंगार गोळा करत असल्याने त्याची योग्य ती विल्हेवाट लावण्यात येत नाही असे दिसून आले आहे.भंगार साठवून ठेवल्यामुळे साहजिकच सर्व परिसरात घाणीचे साम्राज्य पसरल्याने येथील स्थानिक नागरीकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनची आरोग्य यंत्रणा हे सर्व प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरली असल्याचे काळभोर यांनी सांगितले आहे.तसेच गेल्या काही वर्षांत कुदळदवाडी भागात आग लागण्याचे प्रमाणही वाढले असून आग नियंत्रणात आणताना अग्निशामक दलाच्या जवानांना मोठ्या प्रमाणावर कसरत करावी लागत आहे. तर दुसरीकडे कुदळदवाडी, चिखली, मोशी आणि तळवडे भागात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या भंगार माफियांनी पोलिस अधिकारी व कर्मचारी ह्यांना हाताशी धरले आहे. पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त याची दखल कधी घेणार? भंगार माफियाच्या विरोधात कारवाई करण्यास आयुक्त टाळाटाळ करत आहे का? असे प्रश्न त्यांनी उपस्थित केले आहेत.

गेल्या महिन्यात पुण्यात कोथरूड परिसरात अतिरेकी सापडले त्या पार्श्वभूमीवर कुदळदवाडी भागात पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त ह्यांनी कोंबिंग ऑपरेशन राबवून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्ती आणि भंगार व्यवसायात सहभागी असलेल्या ठिकाणी कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लेखी पत्राद्वारे व ईमेल द्वारे करण्यात आली आहे.

कुदळदवाडी भागात भटकळ बंधू वास्तव करत असल्याचे ह्या पुर्वी पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
कुदळदवाडी भागातील भंगार गोदामाच्या ठिकाणी अनेक परप्रांतिय कामगार काम करतात,त्यांची चरित्र पडताळणी पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त कधी करणार?की राजकीय दबावामुळे पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्त दखल घेत नाही? अतिरेकी कारवाया घडल्या नंतरच पोलिस प्रशासन कारवाईचा बडगा उगारणार आहे अशी विचारणा त्यांनी केली आहे.

यावर खबरदारीचा उपाय म्हणून पिंपरी चिंचवड शहरातील मोशी,चिखली,तळवडे
कुदळदवाडी,भागातील भंगार माफिया ह्यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी अशी नागरिकांकडून मागणी होत असल्याचे सांगितले.

Related posts

पिंपळगाव टोल नाक्यावरील कर्मचाऱ्यां विरोधात तक्रार,पुरुष आणि महिला कर्मचारी यांची दादागिरी.

pcnews24

ओला,उबेर रिक्षा होणार बंद.. पुणेकरांसाठी चिंतेची बातमी.

pcnews24

पोलीस होणाऱ्या साईनाथची नक्षलींकडून निर्घृण हत्या,युवकांच्या प्रगतीला नक्षलींकडून विरोध.

pcnews24

महापालिकेच्या वतीने महिला सबलीकरणाचा ‘सिद्धी उपक्रम’३०० महिलांकडून होणार मालमत्ता कराच्या देयकांचे वाटप.

pcnews24

शहरातील पर्यावरणाच्या संवर्धनासाठी महापालिकेचा उद्योजकांशी संवाद..

pcnews24

वाकड भागातील मानकर चौक व कस्पटे वस्ती परिसरात सुमारे पाच तास वीज खंडित

pcnews24

Leave a Comment