February 24, 2024
PC News24
आरोग्य

महाराष्ट्र:राज्याच्या सर्व शासकीय रुग्णालयात रुग्णांना मिळणार मोफत उपचार.

महाराष्ट्र:राज्याच्या सर्व शासकीय रुग्णालयात रुग्णांना मिळणार मोफत उपचार.

राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभागाच्या सर्व रुग्णालयांमध्ये नागरिकांना मोफत उपचार मिळणार आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे. आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असून त्यांचे हे मोठे यश मानले जाते.शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील गरीब, गरजू रुग्णांना मोठा दिलासा मिळणार आहे.

भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल २१ नुसार Right to Health चा नागरिकांना अधिकार आहे. त्यानुसार आज हा निर्णय घेण्यात आला आहे. प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, स्त्री रुग्णालय, जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, संदर्भ सेवा रुग्णालय , कॅन्सर हॉस्पिटल नागरिकांना मोफत उपचार मिळणार आहे.

सध्या या सर्व रुग्णालयांमध्ये वर्षभरात सरासरी अडीच कोटी नागरिक उपचार घेण्यासाठी येत असतात. राज्यात सार्वजनिक आरोग्य विभागाच्या एकूण २५१८ शाखा आहेत. या सर्व ठिकाणी रुग्णांना नि:शुल्क उपचार मिळणार आहेत.

Related posts

शहरात मृत झालेल्या जनावरांचे पुणे महापालिकेच्या नायडू पॉण्ड येथे दफन होणार

pcnews24

ड्रोनची नजर असणार अनधिकृत बांधकामावर

pcnews24

मावळ:पुरेसा पाऊस न पडल्याने पाणी कपातीचे संकट.

pcnews24

Apple ने iOS 16.4 अपडेट केलं रिलीज, मिळणार हे जबरदस्त फीचर्स

Admin

पिंपरी चिंचवड:राज्य बालहक्क संरक्षण आयोग सदस्यांची वायसीएम रुग्णालयाचा भेट.

pcnews24

तळेगाव दाभाडे नगर परिषदे कडून रविवारी ई कचरा संकलन मोहीम.

pcnews24

Leave a Comment